फ्रान्समध्ये आयफोन 12 च्या विक्रीवर बंदी

    दिनांक :16-Sep-2023
Total Views |
- किरणोत्सर्ग जास्त असल्यामुळे सरकारचा निर्णय
 
पॅरिस,
मर्यादेपेक्षा जास्त किरणोत्सर्गामुळे फ्रान्समध्ये iPhone 12 banned आयफोन 12 च्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे. यावर अमेरिकन टेक कंपनी अ‍ॅपलने सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अतिरिक्त किरणोत्सर्गाची समस्या दूर होईल, असा त्यांचा दावा आहे. फ्रान्सने या निर्णयाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे, अ‍ॅपललाही आशा आहे की, सॉफ्टवेअर अपडेटनंतर फ्रान्स ही बंदी उठवेल.
 
 
iPhone banned
 
एका वृत्तानुसार, फ्रान्सने दावा केला आहे की, iPhone 12 banned आयफोन-12 मॉडेल युरोपियन युनियन (ईयु) मानकांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करते. फ्रान्सच्या या निर्णयावर अ‍ॅपलने म्हटले आहे की, आम्ही वापरकर्त्यांना फ्रेंच नियामकांच्या प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट जारी करू. सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची गरज नाही, ही समस्या केवळ फ्रेंच  यामकांच्या विशिष्ट चाचणी प्रोटोकॉलशी संबंधित आहे. डिजिटल मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील रेडिएशन वॉचडॉग सॉफ्टवेअर अपडेटची चाचणी ईयु मानकांच्या कक्षेत आहे की नाही, हे शोधण्यासाठी वेगाने चाचणी करण्याची तयारी करीत आहे. ते जास्त असेल तर, आयफोन-12 च्या विक्रीवर बंदी कायम राहील.
 
 
 
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अ‍ॅपलने फ्रान्समध्ये iPhone 12 banned आयफोन-12 च्या रेडिएशन विवादाबाबत कोणतेही विधान करण्यास किंवा त्यांच्या टेक सपोर्ट स्टाफला माहिती देण्यास नकार दिला आहे. याबाबत ग्राहकांनी प्रश्न विचारल्यास आमच्याकडे या विषयाची कोणतीही माहिती नसल्याचे त्यांना सांगावे, असे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले आहे. अ‍ॅपलने 2020 मध्ये आयफोन-12 मॉडेल लाँच केले. हे कंपनीचे जुने मॉडेल आहे. अलिकडे अ‍ॅपलने आयफोन-15 मालिका मॉडेल लाँच केले आहे, तर आयफोन-12 आता टप्प्याटप्प्याने बंद होण्याच्या प्रक्रियेत आहे. एका अहवालानुसार, अ‍ॅपलने गेल्या वर्षी युरोपमध्ये 50 दशलक्षाहून अधिक आयफोन विकले आणि 95 अब्ज डॉलर्सची कमाई केली. कंपनीसाठी अमेरिकेनंतर युरोप ही दुसरी मोठी बाजारपेठ आहे.