सांदीपनि शाळेचा संस्थापक दिन हर्षोल्हासात साजरा

sandipani school-nagpur पुष्पांजली आणि अभिवादन

    दिनांक :16-Sep-2023
Total Views |
नागपूर,
 
sandipani school-nagpur सांदीपनि शाळेचे संस्थापक डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जन्मदिनी 14 सप्टेंबरला दरवर्षी स्थापना दिवस 'श्री श्री पर्व' या नावाने साजरा करण्यात येतो. यावर्षी 'श्रीकृष्णगीतार्पणम्' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम 14 सप्टेंबरला स्थानिक वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. sandipani school-nagpur या कार्यक्रमातून संगीत सृष्टीतील दिग्गजांना मानवंदना देण्यात आली. लता मंगेशकर, पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, बालसुब्रमण्यम्, मोहम्मद रफी, श्रेया घोषाल, कविता कृष्णमूर्ती या कलाकारांनी गायिलेल्या, रचलेल्या श्रीकृष्ण गीतांवर आधारित नृत्य व नाटिका सादर करण्यात आल्या. sandipani school-nagpur
 
 
 

sandipani school-nagpur 
 
 
 
आकर्षक वेशभूषा, साजेशी मंचसज्जा, ओघवते संचलन यांनी कार्यक्रमात रंगत आणली. sandipani school-nagpur या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आणि निवृत्त एअर कमांडर जे. एम. जोशी उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवत्ताधारक विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. sandipani school-nagpur डाॅ. श्रीकांत जिचकार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या अध्यक्ष राजश्री श्रीकांत जिचकार, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ व अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
सौजन्य : स्मिता बोकारे, संपर्क मित्र