आज आहे ‘गॉकोमोली डे' !

today-grocomoli day काय आहे गॉकोमॉली? जाणून घेऊ या!

    दिनांक :16-Sep-2023
Total Views |
- सायली मोकाटे-जोग
 
today-grocomoli day ‘काय नाव म्हणालीस गं? आणि त्याची चटणी म्हणालीस त्याचं काय नाव?'
‘आवकाडो... आणि चटणी काय? ती गॉकोमोली'!
डिप म्हणा अगर स्प्रेड म्हणा... एकाअर्थी चटणीच की ती आवकाडोची! today-grocomoli day सालसा म्हणजे तरी काय? आपली कोशिंबीर! बरिटो म्हणजे गुंडाळी (की गुंडाळा?मोठा असतो म्हणून पुल्लिंगी?) एम्पनाडा म्हणजे ओली करंजी! डंपलिंग्ज म्हणजे तिखट मोदक ! फहिता...स्पेलिंगच ज्याचे ‘फजिता' ते नक्की काय पाहावे तर तो गरमगरम भाजीफ्राय...भेजाफ्राय नव्हे! पास्ता, नूडल्स म्हणजे शेवया व तिचे भाऊबंद! पॅनकेक म्हणजे गोड डोसा! today-grocomoli day मग केकला ‘मैदावड्या' म्हणावे की फुलून येतो म्हणून गोड ढोकळा? पिझ्झा आणि सँडविचला तर आपण तसंच स्वीकारलं आहे.
 

today-grocomoli day 
 
‘पुन्हा एकदा सांग ग त्याचं नाव?' today-grocomoli day
‘ह... वा...का...ढू...'
‘कोणाची ‘हवा' काढतेस? वात्रट...'
‘आता नक्की लक्षात राहील तुझ्या. बघ ह-वा-का-ढू ला जरा ऍक्सेंट लावला की झालं आ-वह-का-डो!'
परक्या देशात जगताना कितीही तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध असली तरी भौतिक अंतर हे जाणवतेच. रोजच्या लढाया आपल्यालाच लढाव्या लागतात आणि आप्तस्वकिय जवळ नाहीत याची खंत मनात राहते. today-grocomoli day परदेशात राहून रोजच्या खाण्यात आणि स्वयंपाकात सहज आलेले, मुद्दाम सोयीसाठी करावे लागलेले बदल... मग कधी परक्या खाद्यसंस्कृतीची मैत्री व्हावी म्हणून आपल्या अंगवळणी पडलेल्या खाद्यरुचींशी त्याच्या जुळवलेल्या जोड्या, टोपणनावे, गमतीदार अपभ्रंश ! अमेरिकेत राहिल्या लागल्यानंतर घासपुस खाणारे आमच्यासारखे शाकाहारी लोक इटालियन, मेक्सिकन खाद्य संस्कृतीला शरण जातात. शेवयांचे भाऊबंद (इटालियन) पास्तारूपात तर मुळात पोळीशी साधर्म्य असणारा मेक्सिकन टॉर्टिया, मऊ-गुरगुट्या नसला तरी भात आणि ब्लॅक बीन नामक उसळ... हे प्रमुख तीन अन्नप्रकार पोटातले कावळे शांत करतात. today-grocomoli day
 
 
मग त्याबरोबर येणाऱ्या चिप्स, सालसा, सॅलड, पिवळं चीज, सॉवर क्रीम, गॉकोमोली असं काय काय चालून जातं, आवडायलाही लागतं. today-grocomoli day (आताशा भारतातही ठराविक भाजी दुकानात अवकाडो ही मेक्सिकन फळं मिळतात.) तर सांगायचा मुद्दा असा की, रोजच्या इतर चटण्यांप्रमाणेच घरात अवकाडोची गॉकोमोली आवडीने केली व खाली जायला लागली. मुळात अवकाडोला चव अशी काही नाही मात्र पोषणमूल्य उत्तम. पिवळट छटा असलेला पोपटी हिरवा मलईदार गर त्याला मीठ, लिंबू किंचित लसूण, कच्चा कांदा लावून जोडीला मराठी ट्विस्ट दिला की झालं काम! today-grocomoli day बघितलेल्या, वाचलेल्या पाककृतीतून रचलेली ही गॉकोमोली रेसिपी. एकदम सोपी, मस्त आणि स्वस्थ.
साहित्य today-grocomoli day
- २ मोठे आवकाडो (छोटे असल्यास ३)
- पाव कप चिरलेला कांदा. (ऐच्छिक. कांदा शक्यतो पांढरा/पिवळा. लाल कांदा वापरताना आवकाडोचा नैसर्गिक हिरवट-पोपटी रंग मार खाऊ शकतो.)
- १ छोटी लसूण पाकळी (ऐच्छिक)
- पाव चमचा मिरे पूड (कांदा-लसणाशिवाय पाककृती करायची असल्यास)
- अर्धी मिरची (चवीप्रमाणे कमी अधिक. आलापिनो वा सेरेनो पेपरऐवजी साधी मिरची वापरली तरी चालते मात्र आलापिनो वा सेरेनो पेपरने चव खास येईल)
- २ काड्या कोथिंबीर
- पाव कप लिंबू रस (आवडीनुसार कमी जास्त)
- १ चमचा (टीस्पून) वा चवीप्रमाणे मीठ
- पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो (ऐच्छिक)
- पाव कप गाभुळलेली कैरी किंवा आंबा बारीक तुकडे (ऐच्छिक)
कृती - today-grocomoli day
 
प्रथम मिक्सरमध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर हे फिरवून करावे. (अगदी गाळ वाटायचे नाहीत, चॉपर असेल तर तो उत्तम म्हणजे खूप बारीक होत नाही आणि ठेचल्यासारखे दिसेल.) त्यात आवकाडो (बी आणि साल काढून), लिंबू रस, मीठ घालून हलके फिरवून घ्यायचे. आवकाडोच्या घट्ट मलईत बारीक चिरलेले टोमॅटो आणि आंबा तुकडे त्यात घालून एकत्र हलवून घ्यावे की झाली गॉकोमोली तयार. टोमॅटोचे लाल, आंबट गोड आंब्याचे केशरट तुकडे - पोपटी हिरव्या आवकाडो गरात छान दिसतात आणि लसूण-कांदा-मिरची-लिंबूने आलेली चव अशी गॉकोमोली छान लागते. कांदा लसूण खात नसाल तर वगळावा. त्याऐवजी पाव चमचा भरडलेली मिरी टाकली तरी चालेल. एरवी कुठलाही पास्ता, टोस्ट वा मेक्सिकन पदार्थ - भात, बरिटो, किंवा कॉर्नचिप्सबरोबर खाल्ली जाणारी ही गॉकोमोली आपल्या उडीदाच्या पापडाबरोबरही मस्त लागते. today-grocomoli day
 
१६ सप्टेंबर हा अमेरिका, मेक्सिकोत गॉकोमोली दिन. today-grocomoli day त्यानिमित्ताने ही पाककृती! घरी केली नसेल तर जरूर करा आणि खाऊन सांगा कशी वाटली ते!
 
टेक्सस 
+१(८१८) ६२०-७११९