दिल्लीत तृतीयपंथियांसाठी विशेष ओपीडी सेवा

17 Sep 2023 21:36:52
नवी दिल्ली, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (Special OPD services) राजधानी दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात तृतीयपंथियांसाठी देशातील पहिला विशेष बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला. याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सूत्राने सांगितले.
 
 
Special OPD services
मागील अनेक वर्षांपासून तृतीयपंथियांसाठी सरकारी रुग्णालयात (Special OPD services) विशेष ओपीडी सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी या समुदायाच्या वतीने करण्यात येत होती. प्रलंबित असलेली ही मागणी लक्षात येत आज पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी राममनोहर लोहिया रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय शुक्ला यांच्या हस्ते विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला. या संदर्भात डॉ. शुक्ला यांनी सांगितले की, ही विशेष सेवा प्रत्येक शुक‘वारी दुपारी दोन वाजतापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत उपलब्ध असेल. त्यासाठी वेगळा नोंदणी कक्ष तयार केलेला आहे. हार्मोन्स विश्लेषण आणि हार्मोनल उपचारांसोबतच अँडोकि‘नोलॉजी, मानसिक वैद्यकीय तपासणी, प्लॅस्टिक सर्जरीचीही सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय त्वचा, रक्त, मूत्र तपासणीही करण्यात येणार आहे.
 
 
समुदायाकडून स्वागत
दरम्यान, देशातील पहिला (Special OPD services) विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू केल्याबद्दल तृतीयपंथीय समुदायाकडून रुग्णालयाचे आभार मानण्यात आले. याआधी रुग्णालयात येण्यासाठी मनात संकोच निर्माण होत होता, असे काहींनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0