रविवार, 17 सप्टेंबर 2023 ते शनिवार, 23 सप्टेंबर 2023

    दिनांक :17-Sep-2023
Total Views |
साप्ताहिक राशीफळ 
 
 
saptahik
मेष (Aries) : प्रगतीचे वातावरण : 
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता आपणास सर्वसाधारणपणे मानसन्मान, कुटुंबात व कार्यक्षेत्रात आपले महत्त्व वाढविणारा हा सप्ताह राहील, असे वाटते. याशिवाय या आठवड्यात आपणास आर्थिक आघाडीवर समाधानाचे वातावरण अनुभवास मिळावे. आर्थिक आवक व्यवस्थित सुरू राहील. घर, वाहन खरेदीसारख्या मोठ्या योजनांना या सणांच्या मोसमात मूर्त रूप लाभू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यवसाय तसेच नोकरीतील वातावरण सहकार्याचे व प्रगतीचे राहील. विद्यार्थ्यांना हे ग्रहयोग यश देणारे ठरतील.
शुभ दिनांक - 18, 19, 22, 23.
 
 
 
वृषभ (Taurus) : कल्पना साकारेल
आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास सर्वसाधारणपणे धन, नोकरी व कार्यक्षेत्रात वृद्धिकारक योग देणारा ठरण्याची शक्यता आहे. काहींना मात्र आरोग्याबाबत चिंता वाढविणारा ठरू शकतो. त्यामुळे या सणांच्या दिवसात उगाच मनाचा हिरमोड होऊ नये यासाठी आरोग्य जपले पाहिजे. खाण्यापिण्याचे पथ्य व वेळापत्रक सांभाळावे. काही जणांना एखाद्या विदेशी उद्योगात गुंतवणूक करण्याचेही योग निर्माण होतात. आपल्या योजनांमध्ये मित्रवर्ग व कुटुंबाचे पुरेपूर सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - 19, 20, 21, 22.
 
 
 
मिथुन (Gemini) : मरगळ झटकावी
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास सर्वसाधारणपणे सौख्यकारक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती, नवविवाहितांना संततीस हितकारक हा काळ ठरू शकतो. याशिवाय आपल्या योजनांना व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणे अतिशय उत्तम व शुभफलदायी ठरू शकेल. व्यवसायादी क्षेत्रात आपले नशीब आजमावू पाहणार्‍यांनी उत्तम योग पाहून त्याचा शुभारंभ करावयास हरकत नाही. अगोदरपासून व्यवसाय सुरू आहेत त्यांना मरगळ झटकून नव्या उमेदीने मुसंडी मारावयास हा काळ उत्तम फलदायी ठरेल. शुभ दिनांक - 17, 19, 21, 23.
 
 
 
कर्क (Cancer) : प्रवास, दगदग-धावपळ
आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता आपणास हा सप्ताह काहीसा क्लेषकारक व दगदगीचा ठरू शकतो. काही मंडळींच्या कुटुंबात मतभेद, तणाव निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे आपल्या व्यवसाय व नोकरीत वाढ दर्शविणाराही राहील. याशिवाय या आठवड्यात आपणास एखादी मोठी खरेदी करण्याचेही योग संभवतात. सणांच्या या आनंददायी दिवसात वाहन, दागिने वगैरेंची खरेदी किंवा स्थायी संपत्तीत वृद्धी करणारा योग संभव आहे. खर्च मोठा असला तरी तो सहज उचलता येणार आहे. आपली स्वप्ने साकार होण्यास मदत मिळेल. ऐनवेळी प्रवास करावा लागणे, प्रवासात दगदग वगैरे संभव आहे.
शुभ दिनांक - 17, 18, 19, 22.
 
 
सिंह (Leo) : व्यावसायिक यश
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता आपणास सर्वसाधारणपणे दगदग, मेहनत, काहीसे कष्ट घ्यावयास लावणारा हा सप्ताह दिसतो. तथापि तो प्रवास, विदेशगमन, उच्चशिक्षण यासंबंधाने घडण्याची शक्यता असल्यामुळे तो काहींना लाभकारक ठरू शकतो. याशिवाय आर्थिक व व्यावसायिक यश मिळवून देणारेही योग बनत आहेत. पदोन्नती, पगारवाढ, कामाचे कौतुक होणे आदी आपले महत्त्व वाढवणारे योग यावेत. व्यवसाय विस्ताराचे योग संभवतात. यामुळे सणांच्या या उत्साहपूर्ण वातावरणात आनंदाची भरच पडावी. शुभ दिनांक - 18, 19, 20, 21.
 
 
 
कन्या (Virgo) : आर्थिक सबलीकरण
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास विशेष धनलाभदर्शक ठरणार आहे. तो नोकरी-व्यावसायातून होणारी आर्थिक आवक वाढविणारा ठरू शकतो तसेच संपत्तीविषयक काही विशेष योग देणारा राहील. यामुळे आपल्या आर्थिक बाजूच्या सबलीकरणाच्या प्रयत्नांना बळ मिळेल. एकप्रकारे त्यांची पुष्टीच होणार आहे. नोकरी-व्यवसायात उत्तम संधी, धनलाभाचे योग निर्माण होत आहेत. त्यांचा लाभ घेतला पाहिजे. कोणतीही संधी हातून जाणार नाही याची काळजी घ्यावी. काहींना नोकरी बदलाचे यावेत.
शुभ दिनांक - 20, 21, 22, 23.
 
 
 
तूळ (Libra) : प्रतिष्ठा उंचावेल
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास मानसन्मान, कुटुंबात व कार्यक्षेत्रात आपले महत्त्व वाढविणारा ठरावा असे दिसते. सणांच्या सध्याच्या आनंदी व उत्साही वातावरणात आपल्या पुढाकाराने काही कौटुंबिक गोष्टी तडीस नेता येऊ शकतील. त्यात सर्वांचे सहकार्य मिळू शकेल. काही युवांना तो विवाहयोग देऊ शकतो. अनुरूप जोडीदार मिळविण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. याशिवाय आपणास लाभलेले ग्रहमान बघता विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स-आयटी क्षेत्रात असणार्‍यांना नोकरीच्या अतिशय चांगल्या संधी लाभू शकतात.
शुभ दिनांक - 18, 19, 22, 23.
 
 
 
वृश्चिक (Scorpio) : परिवर्तनाची शक्यता
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास काहीसा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नोकरी-व्यवसायातील व्यग्रता वाढू शकते. काहींचा खर्च वाढू शकतो. काही अनावश्यक खर्च होऊ शकतात; असे असले तरी या सप्ताहातील काही घडामोडी आपणास प्रगतीसाठी संधी देणार्‍या ठरू शकतील. काही जणांना नोकरी, घर, व्यवसाय यात परिवर्तनाची शक्यता निर्माण करीत आहे. काहींना प्रसंगी बदली वगैरेच्या टप्प्यातून जावे लागू शकते. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना दुसर्‍यावर पूर्णपणे विसंबून चालणार नाही. आर्थिक व्यवहारात सावध राहा.
शुभ दिनांक - 18, 20, 21, 22.
 
 
धनु (Sagittarius) : आकस्मिक खर्च
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास सर्वसाधारणपणे लाभकारक ठरेल. आपल्या योजनांना बळ देऊन कार्यक्षेत्रात आपले महत्त्व वाढविणारा राहील. आपल्या कामातील कसब पाहून अधिकारी वर्ग खूश होऊ शकतो. यामुळे कार्यालयातील आपले महत्त्व वाढेल. त्याचा लाभ वाढीव पद-पगार या दृष्टीने होऊ शकेल. कार्यक्षेत्रातील विरोधकांची एकजूट काहीशी कुरबूर निर्माण करणारी ठरू शकते. कौटुंबिक आघाडीवर समजूतदारपणा बाळगा. आकस्मिक खर्चांनी डगमगून जाऊ नका.
शुभ दिनांक - 18, 19, 22, 23.
 
 
 
मकर (Capricorn) : आनंदाला उधाण
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास सर्वसाधारणपणे धनवर्धक व काही मोठ्या खर्चास प्रोत्साहन देणारा राहील, असे दिसते. यामुळे सणांच्या या मोसमात उत्साहाला व आनंदाला जणू उधाण लाभावे. वाहन, घर वगैरे खरेदी करणे, मोठी गुंतवणूक करणे शक्य व्हावे. शिवाय नोकरी-व्यवसायास हा सप्ताह पूरक ठरेल. दरम्यान, या राशीच्या काही मंडळींना या आठवड्याची सुरुवात जरा अनुत्साहदर्शक ठरून काही संधी व्यर्थ जाण्याचा प्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सावध असावे. आपला आर्थिक डोलारा शाबूत राहील.
शुभ दिनांक - 17, 20, 21, 22.
 
 
 
कुंभ (Aquarius) : सतर्कता बाळगावी
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास काही महत्त्वाच्या संधी देणारा व सौख्यकारक ठरणार आहे. नवीन नोकरी, व्यवसाय, विवाहेच्छू युवांना विवाह, नवदाम्पत्यांना संतती या संबंधाने अनेकांना उत्तम योग लाभावेत. काहींना विदेश भ्रमण घडू शकते. सणांचा मोसम पाहता नवी गुंतवणूक, व्यवसाय विस्तार करता येऊ शकेल. आर्थिक व्यवहारात कोणतेही पाऊल घाईगडबडीने उचलू नये. नोकरीतील तणावाचे वातावरण निवळू शकते. अधिकार्‍यांची मर्जी मिळविण्याचा प्रयत्न करा.
शुभ दिनांक - 17, 18, 19, 23.
 
 
 
मीन (Pisces) : नियोजन आवश्यक
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता हा सप्ताह आपणास काहीसा क्लेषकारक ठरण्याची शक्यता दिसते. काहींना आरोग्याच्या कुरबुरींमुळे तो त्रासदायक ठरू शकतो. काही जणांना कुटुंबातील वातावरण व आर्थिक संबंधाबाबतही तो काहीसा अनिष्ट ठरण्याची शक्यता राहील. या अनुषंगाने काही सावधगिरी बाळगली पाहिजे. आरोग्याबाबत नेहमी सतर्क राहावे. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत. हवामान बदलामुळे संक्रमित होणार्‍या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावयास हवे. व्यवसायात स्पर्धा वाढेल. दगदग, कामातील व्यग्रता वाढेल. अशात नियोजन आवश्यक राहील.
शुभ दिनांक - 17, 20, 21, 22.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746