भक्ती गणेश महिला मंडळाच्या गणेशोत्सवात स्पर्धा

    दिनांक :18-Sep-2023
Total Views |
बुलढाणा, 
येथील (Ganesh Mahila Mandal) भक्ती गणेश महिला मंडळाच्या वतीने मंगळवारपासून सुरू होणार्‍या दहा दिवसीय गणेशोत्सवात विविध स्पर्धा, पारंपारिक खेळ, आरोग्य विषयक कार्यक्रम तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दि. 19 सप्टेंबर रोजी श्री गणरायाची सांस्कृतिक शोभा यात्रा व स्थापना. दि. 23 सप्टेंबर रोजी निबंध स्पर्धा मैदानी खेळांचे महत्त्व या दोन विषयांवर 1000 शब्दात मर्यादित घरून निबंध लिहून मंडळात आणून द्यायचा आहे.
 
Ganesh Mahila Mandal
 
दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 5 वेळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दि. 24 ला रक्तदान शिबिर व वृक्षारोपण सकाळी 9 वाजता दुपारी 4 वाजता पारंपारिक व (Ganesh Mahila Mandal) देशी खेळांच्या स्पर्धा यात लुप्त होत जाणारे जे जुने खेळ आहेत उदाहरणार्थ भोवरे,गोट्या, लगोरी यासह विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 26 सप्टेंबर रोजी पूजा ताट व थाळी सजवणे स्पर्धा. मोफत आरोग्य शिबिर व औषधोपचार तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे 28 सप्टेंबर रोजी गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल. या गणेशोत्सवास अजिंक्य वैभव मंगल कार्यालय पोलीस कवायत मैदानाजवळ येथे शहरातील सर्वांनी भेट देऊन आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा असे आवाहन भक्ती गणेश महिला मंडळाच्यावतीने अंजली परांजपे, डॉ. गायत्री सावजी, प्रज्योति सावजी ,गीता नागपुरे,चंद्रकला महाले,प्रिया गोफणे यांच्यासह सभासद भगिनींनी केले आहे.