स्टेट बँकेला फसवणार्‍या विकसकाविरोधात एफआयआर

18 Sep 2023 17:08:16
मुंबई, 
State Bank : भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वातील 15 कर्जदारांची 3,800 रुपयांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने मुंबईतील युनिटी इन्फ‘ाप्रोजेक्ट लि. या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आणि अज्ञात लोकसेवकांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
 
State Bank
 
स्टेट बँकेच्या (State Bank) तणावातील संपत्ती व्यवस्थापन शाखेच्या उप महाव्यवस्थापकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी एफआयआर दाखल करण्यात आली. या कंपनीला स्टेट बँकेच्या नेतृत्वातील कर्जदारांनी 3,800 कोटी रुपयांची विविध कर्जसुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, या कंपनीने काल्पनिक व्यवहार दाखवून तसेच खातेवहीत चुकीच्या नोंदी दाखवून, निधी वळता करून फसवणूक केली, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0