जम्मू-काश्मिरात ‘कोब्रा’ची पहिली तुकडी दाखल

18 Sep 2023 16:55:03
श्रीनगर, 
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरातील दहशतवादी कारवायांच्या पृष्ठभूमीवर आता केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात् सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोचे पथक कुपवाडा जिल्ह्यात तैनात केले आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवादी कारवाया काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे तेथील कोब्रा कमांडोच्या काही पथकांना जम्मू-काश्मिरात तैनात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. कोब‘ा कमांडोच्या या पथकांनी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, त्यांचा अद्याप कोणत्याही मोहिमेत वापर करण्यात आलेला नाही.
 
Jammu and Kashmir
 
अधिकार्‍यांनी यासंदर्भात सांगितले की, देशातील नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याने सुरक्षेचे आव्हान निर्माण झाले होते. त्यावेळी कोब्रा कमांडो दलाची स्थापना करण्यात आली. (Jammu and Kashmir) गेल्या काही वर्षांत कोब्रा कमांडोच्या पथकांनी अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या मोहिमांमुळे नक्षली हिंसाचार कमी झाला. जंगल आणि डोंगराळ भागात दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यात कोब्रा कमांडो तरबेज आहेत. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भागातील परिस्थिती जवळपास सारखीच आहेत. येत्या काही वर्षांत कोब्रा कमांडोंची अशा इतर ठिकाणीही सुरक्षेसाठी तैनाती करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0