अग्रलेख
Ganeshotsav 2023 प्राणिमात्रांच्या आयुष्यात सारे क्षण केवळ सुखाने भरलेले असतील तरीही आयुष्य सपक आणि एकसुरी होते. जगणे ही सुख-दुःख, संघर्ष, आव्हाने आणि संकटे या साऱ्या अनुभवांची एकत्रित शिदोरी असते. त्या अनुभवांना भावनिक बळाची साथ मिळाली की, संघर्ष करण्याची उमेद अधिक बळावते. हे भावनिक बळ नेहमीच वास्तविक असते असे नाही; पण ते निव्वळ आभासीदेखील नसते. Ganeshotsav 2023 खरे म्हणजे, मन हा काही माणसाचा दाखविता येण्यासारखा अवयव नाही, तरीही मनाचे अस्तित्व नाकारता येत नाही. म्हणजे, मन ही काही केवळ आभासी संकल्पना नाही. भावनिक बळ ही अशीच एक गोष्ट असते आणि माणसा-माणसागणीक त्याच्या अदृश्य अस्तित्वाच्या संकल्पनाही वेगवेगळ्या असतात. Ganeshotsav 2023 म्हणूनच या संकल्पनांना आपल्या परंपरेने एक आकार दिला आणि त्याला ईश्वर असे नाव दिले. हा ईश्वर निर्गुण-निराकार आहे असे म्हटले जाते. याचाच अर्थ, आपापल्या भावनांना भावेल अशा कोणत्याही आकारात आपण ईश्वराचे रूप स्वीकारत असतो. Ganeshotsav 2023 जेव्हा मानवी आकलनापलीकडच्या काही बाबींचा अनुभव येतो, तेव्हा अशा बाबी साहजिकच निसर्गनिर्मित मानल्या जातात.
Ganeshotsav 2023 निसर्गाच्या कोणत्याही कृतीचा अन्वयार्थ उलगडणे अवघड होते, तेव्हा निसर्गाचे नियंतेपण हाती असलेल्या ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा बसते. उजाडलेल्या प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या स्थिती पार पडून दिवस मावळला म्हणजे रात्र होऊन अंधार पडणार आणि त्या मिट्ट काळोखात आपले दिवसाचे व्यवहार पार पाडणे अशक्य होणार हा तर निसर्गनियमच आहे. पण काळोख पडला म्हणून आपण भयभीत होत नाही. Ganeshotsav 2023 कारण, ही रात्र संपणार आहे आणि पुन्हा नव्या आकांक्षा, नवी उमेद आणि नवा उत्साह सोबत घेऊन नवा दिवस उजाडणारच आहे, या विश्वासाची आपली अनुभवसिद्ध उमेद जिवंत असते. या उमेदीतून नवी आव्हाने पेलण्याची, संकटे झेलण्याची आणि सुख-दु:खांना सामोरे जाण्याची शक्ती जमा होत असते. अशी शक्ती कोणा शारीरिक बळामुळे प्राप्त होत नाही; त्यामुळे तेथेही पुन्हा मन नावाच्या अदृश्य अवयवाचेच अस्तित्व अधोरेखित होते आणि मनाला बळ देणाèया भक्तीसारख्या भावनांचे महत्त्व स्पष्ट होते. Ganeshotsav 2023 अशा भावनांचीही अनेक रूपे असतात. भक्तिभाव हे त्यातलेच एक रूप मानवाला पिढ्यान्पिढ्यांपूर्वी भावले आणि पुढच्या प्रत्येक पिढीच्या हाती मावळत्या पिढ्यांनी भक्तिभावाचा वारसा सोपविला. पुढच्या पिढ्यांनी तो जपला; जोपासला आणि त्याला उत्साहाचा साजही चढविला. तेव्हा भक्तीला उत्सवाचे आणि सणांचे महत्त्व प्राप्त झाले आणि आयुष्यातील आनंदाच्या क्षणांना वेगळेपणही प्राप्त होत गेले.
सण-उत्सवाच्या परंपरा हा केवळ आपल्या जगण्याचा सोहळा नसतो, तर जगण्यातील आनंद उधळून इतरांनाही तो वाटताना सर्वांच्या जगण्यातील काही संकटांचे, संघर्षांचे किंवा दु:खाचे ओझेदेखील हलके व्हावे हा त्यामागचा हेतू होता. Ganeshotsav 2023 आज राज्यात सर्वत्र अमाप उत्साहाने विघ्नहत्र्या गणेशाचे स्वागत होत आहे. घरोघरी, गल्लोगल्ली आणि गावोगावी आजपासून केवळ गणेशभक्तीने ओथंबलेल्या वातावरणाचा वार्षिकोत्सव अनुभवास येणार आहे; या अनुभवाच्या आगळ्या आनंदात अनेकांच्या आयुष्यातील संकटांचे, संघर्षाचे सावट दूर करण्याचे मानसिक बळ अनेकांना मिळणार आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीचा देशभरातील काळ काहीसा सामाजिक उदासीनतेचा, अस्वस्थतेचा होता. चिंता, काळजीची मनावर दाटलेली काजळी दिवसागणीक घट्ट होत होती आणि नव्याने उजाडणारा प्रत्येक दिवस नवे संकटच घेऊन येणार या भयाच्या ओझ्याने मनामनावर ठाण मांडले होते. Ganeshotsav 2023 उद्याची पहाट तरी पाहावयास मिळेल ना, मिळालीच तर ती नव्या उत्साहाने, नव्या उमेदीनेच भारलेली असेल, की नवे काही अप्रिय घेऊन उजाडेल, या काळजीने प्रत्येक रात्रीच्या अंधाराचे भय अधिक गडद होत होते. काहीतरी चांगले, थोडेफार मनासारखे आणि काहीतरी दिलासादायक घडावे एवढीच त्या काळातील मनामनाची सामान्य अपेक्षा होती. अर्थात, नेहमीच सदासर्वदा सारे काही छान छान घडावे असे कधीच कोणासच वाटत नसते. Ganeshotsav 2023 तशी अपेक्षादेखील नसते. आयुष्यातील सारेच क्षण केवळ सुखाने ओसंडून वाहात राहिले, तर जगण्याचा शोभादर्शक चित्रहीन होईल, याचीही सर्वांस जाणीव असते.
तरीही, उजाडणारा नवा दिवस जर केवळ काही संकटे घेऊनच समोर येणार असेल, तर त्याला हिमतीने सामोरे जाण्याची शक्ती तरी मनामनात असावी एवढीच त्या काळात प्रत्येकाची अपेक्षा होती. Ganeshotsav 2023 असे कसोटीचे क्षण जेव्हा समोर येतात, तेव्हा जगण्यातील अर्थ उलगडू लागतो. मन नावाच्या अदृश्य अवयवास बळ देणाऱ्या भावनांच्या जाणिवा जिवंत होतात आणि भक्तीचे महत्त्व अधोरेखित होते. कारण, ‘दर्शनमात्रे मनोकामनापूर्ति!' असुरक्षिततेच्या, असहायतेच्या ओझ्याने दबलेल्या मनाची संकटे झेलण्याची कुवत कमी झालेली असते, तेव्हा भक्तीची शक्ती त्याला ती हरवलेली उमेद पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मदत करते, हा माणसाचा अनुभव असतो. म्हणूनच जगण्याला उत्सवी आनंद देणाऱ्या गणेशोत्सवासारख्या उत्सवांचा आनंद मनामनातून ओसंडत असतो. गणरायाच्या आगमनासोबत यंदाही त्या आनंदाचा, उत्साहाचा अपार अनुभव राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसू लागला आहे. Ganeshotsav 2023 अवतीभवतीच्या संकटांशी, नकारात्मकतेशी आणि अप्रिय बाबींशी संघर्ष करण्याची मानसिक तयारी आता बळावली आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी आपण खूप काही झेलले, खूप काही सोसले आणि खूप काही गमावूनही बसलो; पण ते दिवस आता सरले आहेत. नव्या उमेदीनिशी नव्याने सामोऱ्या येणाऱ्या दिवसातील सुखाचे क्षण वेचण्याकरिता आपण सज्ज झालो आहोत, हा या उत्साहाचा अर्थ आहे.
गणरायाचे आगमन, गणरायाचा उत्सव हेच या उत्साहाचे कारणही आहे. Ganeshotsav 2023 गणराया हा विघ्नहर्ता आहे, दुःखहर्ता आहे. त्याच्या केवळ दर्शनानेही मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी आपली श्रद्धादेखील आहे. गणरायाच्या भक्तिसान्निध्यात असताना विघ्नाच्या वार्तादेखील आसपास उरू नयेत, अशी आपली भावना असते. अशा अप्रियतेची आसपास चाहूल लागली तर केवळ गणरायाच्या स्मरणानेच त्यांचे हरण होते, असा आपल्या भक्तीचा विश्वास आहे. त्याच्या बळावरच असंख्य संकटांचे अडथळे पार करता येतात, ही आपली भावना आहे. Ganeshotsav 2023 गणरायाच्या आगमनाच्या आणि उत्सवाच्या उत्साहाला या भावनेचीच आरास आहे म्हणून हा सोहळा सर्वत्र देखणेपणाने साजरा होणार आहे. दोन-तीन वर्षांपूर्वीच्या संकटकाळात या सोहळ्यावरच निरुत्साहाचे सावट दाटले होते. गणरायाचा उत्सव कसा साजरा होणार याची चिंता सर्वत्र दाटली होती, पण एका अर्थाने तो आपल्या भक्तिभावाच्याच कसोटीचा काळ ठरला. नेहमी ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाला संयमाने थोडासा आवर घालून तेव्हाही आपण गणरायाचे भक्तिभावाने पूजन केले, उत्सव साजरा केला आणि भक्तीच्या कसोटीचा काळ यशस्वीपणे निभावून नेला. Ganeshotsav 2023 जेव्हा संकटे अवतीभोवती घोंघावत असतात आणि त्यातून बाहेर पडण्याचे मानवी मार्ग खुंटतात, तेव्हा हतबल मनांना देव आठवतो असे म्हणतात.
हे तर केवळ उथळ मानसिकतेचे लक्षण झाले. गणेशभक्तीची पिढ्यान्पिढ्यांची परंपरा अशा उथळपणावर चोख उत्तर देते. उत्सवाचे, आनंदाचे आणि समाधानाचे क्षण ईश्वराला साक्ष ठेवूनच उपभोगावेत. Ganeshotsav 2023 ईश्वराच्या कृपेमुळेच ते भाग्य लाभते असा कृतज्ञभावही जागा ठेवावा, हा सणांच्या उत्साह आणि आनंदाचा उद्देश अजूनही आपण जपला आहे, याचे कारणही तेच आहे. काळानुरूप बदल घडवावा आणि नव्या बदलांचा आनंदाने स्वीकार करावा ही तर आपल्या संस्कृतीचीच शिकवण आहे. परंपरा आणि नवता यांनी हातात हात घालून वाटचाल करावी, ही आजच्या काळाची हाक आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपण सारे सज्ज होत आहोत. Ganeshotsav 2023 अशा काळात संस्कृतीची शिकवण स्वीकारून उत्सवांच्या नवतेच्या वाटेवरील अडथळे समंजसपणे दूर करावेत आणि सामंजस्याने नवतेचा स्वीकार करून संस्कृतीचे संवर्धन करण्याकरिता नव्या वाटा शोधाव्यात हा मध्यममार्ग शक्य आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अशा वाटांचा धांडोळा घेता येईल, तर समाजाच्या बाजारीकरणाच्या वाटेवरील पावले पुन्हा एकदा परंपरांच्या हातात हात घालून चालू लागतील.