आव्हानांचा सामना करीत भारताचा चित्ता प्रकल्प प्रगतीवर

18 Sep 2023 11:18:47
नवी दिल्ली,
India Cheetah project भारतात चित्त्याच्या पहिल्या वर्षातील उल्लेखनीय प्रवास हा यशापयश या दोन्ही गोष्टींनी भारलेला होता. नामिबिया-आधारित चित्ता संवर्धन निधीने हा प्रकल्प प्रगतिपथावर आहे, असे म्हटले आहे. चित्ता संवर्धन निधीने (सीसीएफ) चित्ता भारतात पुन्हा आणण्यासाठी भारतीय अधिकार्‍यांना मदत केली. सीसीएफच्या संस्थापक लॉरी मार्कर यांनी ही योजनेला मूर्त रूप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि 2009 पासून त्यांनी अनेकदा भारतात प्रवास केला आहे.
 
 
India Cheetah project
 
चित्त्यांना भारतात परत आणणे हा आव्हानांनी भरलेला एक धाडसी प्रयत्न होता. प्रकल्प प्रगतीवर आहे आणि नामिबियाला भारतातील चित्ता क्षेत्राचा एक भाग असल्याचा अभिमान आहे, India Cheetah project असे नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष पीटर कटजाविवी यांनी सांगितले. भारतातील चित्त्यांच्या ऐतिहासिक संवर्धनाच्या सुरुवातीच्या वर्षात अडचणी आल्या, तरीही चित्ता प्रकल्प आपल्या ध्येयासाठी समर्पित आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
 
चित्ता प्रकल्प हा भारताचा महत्त्वाकांक्षी उपक‘म आहे. यामुळे देशातून नामशेष झाल्यानंतर चित्त्यांचा पुन्हा परिचय करून देण्यात आला असून, रविवारी त्याचा पहिला वर्धापन दिन होता. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या चित्त्यांच्या तुकडीला सोडले, तेव्हा या उपक‘माची सुरुवात झाली. तेव्हापासून या प्रकल्पावर जगभरातील संरक्षक आणि तज्ज्ञांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे.
Powered By Sangraha 9.0