इस्तंबूल,
Tesla factory : तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी न्यू यॉर्कमध्ये इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांची भेट घेतली आणि तुर्कीमध्ये कारखाना सुरू करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. एर्दोगान संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत आहेत. तुर्कीच्या अध्यक्षीय कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, एलन मस्क यांची अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्स आणि तुर्कीच्या स्पेस प्रोग्राममधील संभाव्य सहकार्यावरही चर्चा झाली.
एर्दोगान यांनी मस्क यांना सांगितले की, (Tesla factory) तुर्की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्पेसएक्सच्या उपग्रह इंटरनेट सेवा स्टारलिंकवरील सहकार्याचे स्वागत करेल. यावर मस्क म्हणाले की, स्पेसएक्सला तुर्कीमध्ये स्टारलिंक ऑफर करण्यासाठी आवश्यक परवाने मिळवायचे आहेत. या बैठकीत उपस्थित असलेले तुर्कीचे उद्योग आणि तंत्रज्ञान मंत्री मेहमेट फातिह कासिर म्हणाले की, मस्क यांनी तुर्कीला टेस्ला गुंतवणुकीसाठी सर्वांत महत्त्वाच्या उमेदवारांपैकी एक म्हटले आहे. ते म्हणाले की, एर्दोगान आणि मस्क यांनी तुर्कीच्या सशस्त्र हवाई ड्रोन कार्यक‘मावरही चर्चा केली.