नवी दिल्ली,
Shah's house राजधानी दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अधिकृत निवासस्थानाकडे जात असलेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांना दिल्ली पोलिसांनी रविवारी अटक केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी या लोकांची चौकशी करत आहेत. डीसीपी (नवी दिल्ली) प्रणव तायल यांनी सांगितले की, एका कुटुंबातील सहा सदस्य परवानगीशिवाय कृष्ण मेनन मार्गाकडे जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती.
डीसीपी म्हणाले, "हे लोक गृहमंत्री अमित शहा राहत असलेल्या ठिकाणाचा शोध घेत असताना, माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक त्या भागात पोहोचले आणि त्यांना वेळीच अटक केली. Shah's house पोलिसांचे पथक या लोकांची चौकशी करत असून गृहमंत्र्यांच्या घराकडे जाण्याचा उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे डीसीपींनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले लोक दिल्लीतील आनंद विहार भागात गाड्या लावायचे आणि गाड्या हटवल्याने ते नाराज होते.