ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
रोहित आज घेणार पत्रकार परिषद
दिनांक :18-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली,
Team Bharat : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सोमवारी संघाची घोषणा करणार आहेत. सोमवारी रात्री साडेआठ वाजता रोहित शर्मा आणि अजित आगरकर खेळाडूंच्या नावांची घोषणा करतील. या पत्रकार परिषदेत श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या दुखापतीबाबतचे अपडेट्सही समोर येऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आणि अजित आगरकर पत्रकार परिषदांद्वारे संघाची घोषणा करत आहेत. हे दोघेही सोमवारी रात्री साडेआठ वाजता पत्रकार परिषदेद्वारे भारतीय संघाची घोषणा करतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही एकदिवसीय मालिका (Team Bharat) भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विश्वचषकापूर्वी संघाची तयारी सुधारण्याची ही शेवटची संधी असेल.
श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संजू सॅमसनचा संघात समावेश होऊ शकतो. दुखापतीमुळे अय्यरला आशिया चषकात फक्त एकच सामना खेळता आला होता. अशा स्थितीत विश्वचषकापूर्वी अय्यरच्या दुखापतीमुळे संघाच्या अडचणी वाढू शकतात. अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदर किंवा आर अश्विनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. चाहत्यांना जिओ सिनेमा अॅपवर भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य पाहता येईल. (Team Bharat) एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 वर केले जाईल. याशिवाय दोन्ही देशांच्या ट्विटर हँडलवरूनही सामन्याचे अपडेट्स घेता येतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मोहाली, इंदूर आणि राजकोटमध्ये मालिका सामने होणार आहेत.