बांबू लागवडीतून शेतकर्‍यांनी मिळवावे अतिरिक्त उत्पन्न

प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांचे प्रतिपादन
बांबू विकास समितीच्या वतीने जागतिक बांबू दिन

    दिनांक :18-Sep-2023
Total Views |
नागपूर,
World Bamboo Day : राज्यात 6 लाख हेक्टर परिसरात बांबू लागवड केल्या जात असून चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयात 80टक्के बांबू लागवड क्षेत्र आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातून सर्वाधिक बांबूची विक्री होते. याच बांबूपासून जवळपास 1800 उत्पादन तयार करुन विकल्या जात आहे, देशविदेशात बांबूची मागणी सतत वाढत असल्याने शेतकर्‍यांनी शेतीसोबत बांबू लागवड केल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांनी व्यक्त केला.
 
World Bamboo Day
 
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ (World Bamboo Day) आणि बांबू सोसायटी ऑफ इंडिया, बांबू विकास आणि संवर्धन समितीच्या वतीने सिव्हिल लाईन्स, चिटणवीस सेंटर येथे जागतिक बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. श्रीनिवास राव, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष प्रा. अभय पुरोहित,बांबू विकास व संवर्धन समितीचे अजय पाटील, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीचे प्रा. दिलीप पेशवे,सुनील जोशी उपस्थित होते.
 
शैलेश टेंभुर्णीकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, शेतजमीन,वनजमीन, महामार्गावर मोठया संख्येने बांबू लागवड करण्याची सुचना निश्चित उपयोगी ठरणारी आहे. बांबूचे उत्पादन वाढविण्यासाठी अभियांत्रिकी संस्थेने बांबू प्रजातीवर संशोधन करावे. तसेच बांबूवर आधारित नवे अभ्यासक्रम सुरु करुन बांबूचे उत्पादन वाढविण्यात मोलाची मदत होणार आहे. एमआयडीसीच्या धरतीवर पहिला फर्निचर क्लस्टर चंद्रपूर येथे सुरू करण्यात आला असून बांबू उद्योगाला चालणा देण्यासाठी (World Bamboo Day) बांबू विकास महामंडळ प्रयत्नशील आहे.
 
शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनातर्फे (World Bamboo Day) बांबू लागवडीच्या दोन योजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत बांबू लागवड करण्यात येत आहे. नागपूरसह चंद्रपूर व इतर जिल्ह्यांत मागील चार वर्षांत 7 हजार 700 शेतकर्‍यांनी या योजनांचा लाभ घेतला असल्याची माहिती बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. श्रीनिवास राव यांनी दिली. आर्थिक संकटातून सावरण्याची क्षमता एकमेव कृषी व कृषीपूरक व्यवसायात असल्याने प्रत्येक शेतकर्‍याने शेतीसोबतच बांबू लागवडीकरीता प्राधान्य देण्याची गरज अजय पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदय गडकरी, प्रताप गोस्वामी, आशिष नागपूरकर, राजेंद्र जगताप, राहूल देशमुख, ममता जयस्वाल,पराग येळणे, प्रगती पाटील, आर.व्ही.ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.