जी-२० ची यशस्वी शिखर परिषद

g20-India-success एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य

    दिनांक :18-Sep-2023
Total Views |
आंतरराष्ट्रीय 
 
- वसंत गणेश काणे 
 
g20-India-success १९९९ साली जी-२० या नावाच्या एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची (फोरम) स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य वाढीला लागावे म्हणून धोरणात्मक बाबींबाबत अध्ययन, पुनरावलोकन किंवा फेरतपासणी आणि चर्चा करणे हा प्रमुख हेतू या गटाच्या स्थापनेमागे होता/आहे. g20-India-success या गटाची उद्दिष्टे जागतिक आर्थिक विषयांवर विचारमंथन करणे, प्रदूषणकारी वायूंच्या निर्मितीचे प्रमाण कमी करणे आणि मजबूत, समतोल, सर्वस्पर्शी आणि शाश्वत विकास साधणे यांच्याशी संबंधित आहेत. या संपूर्ण गटाच्या गटश: किंवा विभागश: बैठकी राष्ट्राध्यक्ष किंवा  प्रतिनिधी स्तरावर ठरावीक कालावधीनंतर होत असतात.g20-India-success
 
 
g20-India-success
 
एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य
जी-२० च्या २०२३ च्या १८ व्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद/यजमानपद १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारताकडे आले आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतली मध्यवर्ती कल्पना ‘वसुधैव कुटुम्बकम् म्हणजेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' ही उपनिषदातील संकल्पना आहे. g20-India-success जी-२० चे बोधचिन्ह साकारताना राष्ट्रध्वजातील भगवा, पांढरा, हिरवा यांसह निळा हे तेजाचे प्रतीक असलेले रंग योजले आहेत. ‘कमळ' या भारताच्या राष्ट्रीय पुष्पाच्या जोडीला पृथ्वीही तिच्यावरील निळ्या रंगातील भूप्रदेशासह दाखविली असून त्यातून विकास आणि आव्हाने प्रतिबिंबित होत आहेत. या चिन्हाच्या सर्वात खाली ‘भारत' हा शब्द देवनागरी आणि रोमन लिपीत लिहिलेला आहे. बोधचिन्ह सुचविण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. g20-India-success अशाप्रकारे भारताने पंतप्रधान मोदींच्या प्रेरणेने प्रारंभापासूनच जनभागीदारीची भूमिका स्वीकारलेली आहे. उपनिषदातील ‘वसुधैव कुटुम्बकम् ' या संकल्पनेत सर्व प्राणिमात्रांचा म्हणजे मानव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मतम जीव (मायक्रो ऑर्गनिझम) अशा विश्वातील सर्व घटकांचे मूल्य, सहअस्तित्व आणि सहकार्य मान्य केलेले आहे. म्हणून तर या भूतलावर सर्वत्र न्यायोचित आणि समान विकास व्हावा म्हणून भारत आपल्या अध्यक्षपदाचा वापर करतो आहे. g20-India-success विकास सर्वांगी, शाश्वत, उत्तरदायी आणि सर्वसमावेशी असावा यावर भारताचा भर असेल. भारतापुरते बोलायचे तर येत्या २५ वर्षांत भारतीय समाज भविष्यवेधी, सर्वसमावेशी, सुबत्तायुक्त आणि विकसित स्वरूपाचा आणि मानवहितकेंद्री भूमिका घेणारा असेल.
 
 
जी-२० किंवा विसांचा गट g20-India-success
नवी दिल्लीतील शिखर परिषद ही जी-२० ची १८ वी बैठक होती. ही शिखर परिषद भारत मंडपम् आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, कन्व्हेन्शन सेंटर, प्रगती मैदान नवी दिल्ली येथे शनिवार, ९ सप्टेंबर २०२३ ते रविवार, १० सप्टेंबर २०२३ या काळात संपन्न झाली. जी-२० qकवा विसांचा गट ही राष्ट्रस्तरावरची संघटना असून त्यात युरोपियन युनियन आणि अन्य विकसित आणि विकसनशील १९ राष्ट्रे आहेत, ती अशी. १) अर्जेंटिना, २) अॉस्ट्रेलिया, ३) ब्राझील, ४) कॅनडा, ५) चीन, ६) फ्रान्स, ७) जर्मनी, ८) भारत, ९) इंडोनेशिया, १०) इटली, ११) जपान, १२) मेक्सिको, १३) रशिया, १४) सौदी अरब, १५) दक्षिण आफ्रिका, १६) दक्षिण कोरिया, १७) तुर्कस्तान, १८) ब्रिटन आणि १९) अमेरिका. g20-India-success युरोपियन युनियनला म्हणजे युरोपमधील देशांच्या गटाला ज्या न्यायाने जी-२० ची सदस्यता मिळू शकली त्याच न्यायाने आफ्रिकन युनियनलाही मिळावी हा अनेक वर्षे लोंबकळत पडलेला मुद्दा यावेळी मोदींच्या पुढाकारामुळे मार्गी लागला. अशा या जी-२० चा आर्थिक डोलारा आता जगाच्या आर्थिक डोलाऱ्याच्या ८५ टक्क्यांपेक्षाही जास्त झाला आहे. जगातला पूर्वी ७५ टक्के असलेला व्यापारही आता आणखी वाढेल. पूर्वी जगातले ६६ टक्केच लोक जी-२० त समाविष्ट होते; त्यातही आता भरघोस वाढ होईल. २००८ पासून जी-२० च्या राष्ट्रप्रमुख, अर्थमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी स्तरावर नियमित बैठकी होत असतात. अशा बैठकीत प्रतिनिधी स्तरावर (शेर्पा) चर्चा करीत असतात. g20-India-success सदस्य नसलेले देश, आंतरराष्ट्रीय संघटना, धर्मादाय किंवा ना नफा तत्त्वावर कार्य करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा बैठकींमध्ये निमंत्रणावरून सहभागी होत असतात.
 
 
जी-२० वर होणारी टीका
मोजक्या आणि निवडक देशांना सदस्यता, प्रत्यक्ष अधिकार नसलेली संघटना, इतर आंतरराष्ट्रीय संघटनांना कमी लेखणारी संघटना अशी विशेषणे विरोधक असणा-यांकडून जी-२० वर लावली जात असतात. जागतिकीकरणाचे विरोधक, प्रखर राष्ट्रवादी व अन्य समविचारी घटकांनी तर अनेकदा यांच्या धोरणांचा, घोषणांचा निषेधही केलेला आहे. g20-India-success तरीही २०११ पासून जी-२० च्या बैठकी दरवर्षी होत आल्या आहेत. जी-२० च्या घटनेनुसार प्रत्येक घटकाचा मताधिकार सारखाच असला, तरी प्रत्यक्षात बाहुबलीच्या- अमेरिकेच्या मताला विशेष महत्त्व असायचे. अमेरिकेची दादागिरी खपवून घेण्याशिवाय इतरांसमोर दुसरा पर्यायच नव्हता/नसे. नाखुशीचे, नाराजीचे, रागाचे स्वर उमटतच नसत असे नाही, पण ते तेवढेच !
 
 
पुतिन आले नाहीत g20-India-success
युक्रेनप्रकरणी रशियाने युद्ध करताना पाळावयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संमत झालेले नियम न पाळल्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले असल्यामुळे ते ब्रिक्स संमेलनासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले नाहीत. गेले असते तर दक्षिण आफ्रिकेला त्यांना अटकच करावी लागली असती. कारण दक्षिण आफ्रिकेने हे नियम पाळण्याच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणून पुतिन यांनी संमेलनात प्रत्यक्ष उपस्थित न राहता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून परिषदेत सहभाग नोंदवला. पुतिन भारतातही आले नाहीत; पण भारताच्या भावनांचा आदर करीत त्यांनी मोदींशी प्रत्यक्ष संवाद साधला. परिषद यशस्वी व्हावी अशी आपली इच्छा असल्याची ग्वाही दिली आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री आपले प्रतिनिधी म्हणून दिल्ली बैठकीत उपस्थित राहतील, असे सांगितले.
 
चीन का अनुपस्थित ? g20-India-success
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंगही आले नाहीत. त्यांच्याऐवजी चीनचे पंतप्रधान उपस्थित राहिले. पण वैषम्यग्रस्त चीनचा कावेबाजपणा याही वेळी दिसून आला. अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश यांना चीनचा भाग दाखवणारा नकाशा याच मुहूर्तावर प्रसिद्ध करण्याचे काही कारण होते काय? सीमाप्रश्नी ताठर भूमिका कायम असल्याचेच चीनने दाखवून दिले नाही काय? खरे तर जोहान्सबर्गमध्ये भोजनप्रसंगी झालेल्या ओझरत्या भेटीत चीनने अगदी उलट भूमिका मांडली होती. g20-India-success तसेच अशी भेट व्हावी, म्हणून चीननेच पुढाकार घेतला होता. नंतर मात्र ही भेट भारताच्या पुढाकाराने झाली होती, असा कांगावा करण्यास चीन विसरला नाही. अमेरिकेने चीनविरुद्ध अधिक कठोर भूमिका घेण्याचे जाहीर केले असून चीनसाठी दुर्मिळ असलेल्या घटकांची चीनला निर्यात थांबवणार असल्याचे जाहीर केले आहे.
 
महागाई, बेकारी आणि उत्पादनात घट यामुळे चीनमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पसरला असून खुद्द शी जिनपिंग यांचे अध्यक्षपद डळमळत असल्याच्या वार्ता जागतिक प्रसार माध्यमात झळकल्या आहेत. g20-India-success अशा कारणांमुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी शिखर परिषदेत आपल्याऐवजी चीनच्या पंतप्रधानांना पाठविण्याचा निर्णय घेतला, असे सर्वत्र बोलले जात आहे. युक्रेन प्रकरणी जी-२० च्या सदस्यांमध्ये सरळसरळ जी-२० म्हणजे चीन व रशिया आणि जी-१८ म्हणजे उरलेले १८ देश असे दोन तट पडले असून सहमती दर्शविणारे संयुक्त पत्रक परिषदेचे शेवटी प्रसिद्ध करण्याचे महाकठीण काम जी-२० चा अध्यक्ष या नात्याने भारतावर येऊन पडले होते. ते मोदींनी अतिशय कौशल्याने पार पाडले. यावरून जागतिक स्तरावरच्या भारताच्या प्रभावाचा परिचय सर्वांना आला आहे.
९४२२८०४४३०