तभा वृत्तसेवा
वर्धा,
Wardha Ganpati : जिल्ह्यात गणशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून प्रत्येक जण गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतो. मंगळवारी 19 रोजी गणेशाची स्थापना होणार आहे. यंदा जिल्ह्यातीन 76 गावात एक गाव एक गणपतीची स्थापना होणार आहे तर 11 हजार 867 घरगुती आणि 236 सार्वजनिक मंडळाद्वारे गणेशाची स्थापना केली जाणार आहे. बाप्पाचे आगमन होणार असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून जय्यत तयारी सुरू आहे.
घराघरांत गणेशोत्सवाची (Wardha Ganpati) तयारी सुरू आहे. गावात शांतता एकोपा राहावा, याकरिता एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली. याला अनेक गावांनी स्वयंस्फूतीने पुढाकारसुद्धा घेतला. यंदा जिल्ह्यातील 76 गावात एक गाव एक गणपतीची स्थापना होणार आहे तसेच 11 हजार 867 घरगुती तर 236 सार्वजनिक मंडळे आहेत. गणेशात्सवासाठी भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली असून ठिकठिकाणी बाप्पांच्या आकर्षक मूर्ती विक्रीला आल्या आहेत. बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल आहे. अनेक भक्तांनी गणेश मूर्तीसुद्धा खरेदी केल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि देखाव्यांची निर्मिती केली आहे.
800 पोलिस कर्मचार्यांचा चोख बंदोबस्त
गणेशोत्सव उत्साहात (Wardha Ganpati) आणि शांततेत पार पडावा याकरिता 800 पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त लावणण्यात आला आहे. यामध्ये 4 उपविभागीय पोलिस अधिकारी, 14 पोलिस निरीक्षक, 7 पोलिस उपनिरीक्षक, दोन प्लाइन एसआरपी पथक, पुरुष होमगार्ड 800 आणि 100 महिला होमगार्ड राहणार आहे.
पोलिस ठाणे - गणेश मंडळ
पुलगाव ः 52
वर्धा ः 26
रामनगर ः 12
सेवाग्राम ः 08
सेलू ः 11
सिंदी ः 01
देवळी ः 05
अल्लीपूर ः 06
खरांगणा ः 10
आर्वी ः 21
कारंजा ः 01
आष्टी ः 11
तळेगाव ः 19
हिंगणघाट ः 32
वडनेर ः 04
गिरड ः 06
समुद्रपूर ः 07