भ्रष्टाचारयुक्त २६ फ्लॅट!

19 Sep 2023 17:23:25
वेध
- विजय निचकवडे
Jyoti-Bhardwaj-Jaipur  स्वप्न अनेक असतात मनात, पण प्रत्येकच पूर्ण होत नाही. स्वत:चे एक घर असावे, हे स्वप्न न पाहणारी व्यक्ती कदाचितच सापडेल. जन्म भाड्याच्या घरात झाला, तरी मरेन तर स्वत:च्याच घरात, असेही गमतीने म्हणणारे आहेत. हे त्यांच्यासाठीच जे स्वत:चे एक तरी घर व्हावे म्हणून सातत्याने धडपडत असतात. Jyoti-Bhardwaj-Jaipur  पण काहींचे नशीब असेही असते की, एक-दोन नव्हे तर २४ तासात तब्बल २६ घरांची खरेदी ते करू शकतात. हा विषय जेवढा आश्चर्याचा वाटतो, तेवढाच चिंता करायला लावणारा आहे. Jyoti-Bhardwaj-Jaipur एकीकडे भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची स्वप्ने दाखविली जातात आणि दुसरीकडे शासकीय सेवेतील अधिकारी विक्रमी खरेदी करीत असतील तर भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची भाषा पोकळ म्हणावी लागेल. धनाढ्यपणाचा दाखला देताना कुबेराचा नामोल्लेख केला जातो. कुबेरासारखी श्रीमंती सर्वांनाच लाभो, असा आशीर्वादही देतात. बघा ना, सर्वसामान्यांवर कुबेर कधीच प्रसन्न होत नाही. Jyoti-Bhardwaj-Jaipur  पण शासकीय नोकरीतील बड्या अधिकाऱ्यांची आणि कुबेराची मैत्री घट्ट असल्याचे दिसते. दिसायला अगदी सोज्वळ आणि साधे दिसत असले तरी वेळ आली की निघणारे घबाड या दोस्तीची आठवण करून देते. Jyoti-Bhardwaj-Jaipur  पण ही श्रीमंती, हे वैभव वाम मार्गाने आलेले असते, हेही तेवढेच खरे!
 
 

Jyoti-Bhardwaj-Jaipur  
 
 
Jyoti-Bhardwaj-Jaipur  आमच्याकडे वाम मार्गाने मिळविलेल्या गोष्टींना भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्ट आचरण करून आलेली मिळकत. अशा आचरणातून आलेल्या पैशाने आनंद विकत घेण्याचा प्रयत्न झाला तरी तो किती समाधान देणारा असेल, ही शंकाच आहे. आता हेच बघा ना, राजस्थानातील जयपूर येथील सचिवालयात आर्थिक सल्लागार या वरिष्ठ पदावर नियुक्त असलेल्या महिला अधिकारी ज्योती भारद्वाज यांनी २४ तासात म्हणे २६ फ्लॅट खरेदी केले, जवळपास ५ कोटी रुपये खर्च करून! यातले १५ स्वतःच्या तर ११ फ्लॅट मुलाच्या नावाने नोंदविले. Jyoti-Bhardwaj-Jaipur  एरवी सामान्य लोकांच्या नोंदणीसाठी कित्येक दिवस लागतात; मात्र या वजनदार अधिकारी महिलेने ४८ तासात सर्व घरांची नोंदणी करून घेतली. ज्या बांधकाम व्यावसायिकाकडून घरे विकत घेतली, त्याच्या खात्यावर धनादेशाची रक्कम दीड वर्ष लोटूनही वळती न झाल्याने हा प्रकार उघडकीस आहे. नियमानुसार सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना मालमत्तेची माहिती दरवर्षी राज्य सरकारला द्यावी लागते. Jyoti-Bhardwaj-Jaipur  मात्र, या अधिकाऱ्याने सदनिकांचा कोणताही उल्लेख त्यात केलेला नाही. केवळ तीन घरांचा त्यात उल्लेख असून दोन घरे स्वतःच्या नावाने कर्ज घेऊन घेतल्याची नमूद आहे. सध्या हे प्रकरण धनादेश न वठल्याने न्यायप्रविष्ट असल्याचे समजते.
 
 
एक शासकीय जबाबदार अधिकारी, ज्याच्याकडे पाहून सामान्य लोक त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्याने सांगितलेल्या गोष्टी सामान्यांसाठी प्रमाण असतात. Jyoti-Bhardwaj-Jaipur  एवढेच नाही, तर हा अधिकारी शासनाचे प्रतिनिधित्व करतो, तोच अशा पद्धतीने हेराफेरी आणि भ्रष्ट मार्गाचा अनुयायी असेल तर स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनाचे काय? एखाद्या सामान्य माणसाने केलेली चूक अक्षम्य असते. राईचा पर्वत करून प्रशासन किती सजग आणि चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आता एका महिला अधिकाऱ्याने दाखविलेल्या पराक्रमाच्या बाबतीत शासनाची भूमिका सामान्यासारखीच असेल का? Jyoti-Bhardwaj-Jaipur  भ्रष्टाचार संपविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी तो कितपत यशस्वी होईल, यात शंका आहे. मात्र, भ्रष्ट मार्गाचा वापर करताना, त्यात काही ‘नैतिकता' जोपासण्याचे सौजन्य दाखवायला नको का? आज २४ तासात २६ सदनिका विकत घेण्याचा विक्रम करून भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्ट होऊ शकते.
 
Jyoti-Bhardwaj-Jaipur  प्रत्यक्ष भ्रष्टाचारातून ही खरेदी झाल्याचे कुठे दिसत नसेल, पण कष्टाचा आणि घाम गाळून मिळविलेल्या पैशातून एवढा श्रीमंती थाट प्रत्येक जण दाखवू शकतो का? आज देशात असे अनेक कुटुंब आहेत, ज्यांच्या डोक्यावर छत नाही. देशाचे पंतप्रधान प्रत्येकाच्या डोक्यावर छत यावे म्हणून संकल्प करीत असताना २६ सदनिकांची खरेदी करीत या महाभाग महिला अधिकाèयाने पंतप्रधानांच्या संकल्पालाही आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. Jyoti-Bhardwaj-Jaipur  हा एवढा पराक्रम करताना धन आणि पदाच्या वजनाखाली अन्य अधिकारीही दबले असतील यात शंका नाही. मग डोळ्यादेखत सर्व असताना राजस्थानचे मुख्यमंत्री जर भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा दावा करीत असतील तर भ्रष्टाचारमूक्त राज्याची व्याख्या मुख्यमंत्र्यांच्या लेखी काय असेल याची कल्पना केली जाऊ शकते. Jyoti-Bhardwaj-Jaipur जोपर्यंत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना  त्यांच्या कर्तव्याची आणि शासकीय सेवेत रुजू होताना घेतलेल्या शपथेची जाणीव होत नाही, तोपर्यंत असे आश्चर्याचे धक्के बसतच राहणार.
९७६३७१३४१७
Powered By Sangraha 9.0