- 100 मीटरची दौड केली पूर्ण
- आता ‘स्लीप मोड’मध्ये जाणार
श्रीहरीकोटा,
प्रज्ञान रोव्हर आतापर्यंत 'Century' of 'Pragyan' चंद्राच्या पृष्ठभागावर 100 मीटर चालला आहे. विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हरची स्थिती उत्तम असून, दोन्हीवरील सर्व पेलोड्स चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. प्रज्ञान आणि विक‘मला ‘स्लीप मोड’मध्ये टाकण्याची प्रक्रिया दोन किंवा तीन दिवसांत सुरू केली जाईल. या कालावधीत चंद्रावर रात्र सुरू होणार असल्याने ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले.
'Century' of 'Pragyan' : एक चांद्रदिवस पूर्ण होण्यापूर्वी किमान 500 मीटर अंतर कापण्याचे उद्दिष्ट रोव्हरने ठेवले आहे. ते एका सेकंदाला एक सेंटिमीटर या वेगाने समोर सरकरत आहे. सौरऊर्जा मिळेल तोपर्यंत म्हणजे पुढच्या पाच ते सहा दिवसांत ते चंद्राच्या पृष्ठभागावर काम करेल.
प्रज्ञान रोव्हरवर लावण्यात आलेली उपकरणे (क्लॉकवाईज)
- सगळ्यात पहिले सोलर पॅनल. या माध्यमातून रोव्हरला ऊर्जा मिळते
- त्याच्या खाली सोलर पॅनल आणि रोव्हरला जोडणारे सोलर पॅनल हिंज
- नेव्हिगेशन कॅमेरे. हे दोन कॅमेरे चंद्राचे डोळे आहेत
- रोव्हरचे चेसिस
- सोलर पॅनलच्या खाली त्याला सांभाळणारे सोलर पॅनल होल्ड डाऊन
- सहा चाकांची ड्राईव्ह असेंब्ली
- असमान पृष्ठभागावर चालण्यास मदत करणारी रॉकर बोगी