अल्झायमरमध्ये पेशींच्या मृत्यूचे कारण उलगडले

शास्त्रज्ञांनी शोधले उत्तर

    दिनांक :20-Sep-2023
Total Views |
लंडन,
Alzheimer cell : 'अल्झायमर' या आजाराची वाढती रुग्णसंख्या चिंता निर्माण करणारी आहे. या विकारात मेंदूच्या पेशी कशा मरतात, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. नवीन संशोधनाची माहिती जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. अल्झायमरवर झालेल्या नवीन संशोधनाबाबत बोलताना इंग्लंडमधील डिमेंशिया रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ बार्ट डी स्ट्रोपर यांनी सांगितले की, हा एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे. प्रथमच अल्झायमर रोगात न्यूरॉन्स कसे आणि का मरतात, याचे संकेत मिळाले आहेत. मागील 30 ते 40 वर्षांपासून याबाबत बरेच अनुमान लावले जात होते. मात्र, याची पुष्टी करण्यात यश आले नव्हते.
 
Alzheimer cell
 
इंग्लंडमधील डिमेंशिया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि (Alzheimer cell) बेल्जियममधील केयू ल्युवेन येथील संशोधकांनी नमूद केले आहे की, न्यूरॉन्समधील मोकळ्या जागेत असामान्य अमायलोईड तयार होण्यास सुरुवात होते. यामुळे मेंदूचा दाह होतो, जो न्यूरॉन्सना आवडत नाही. यामुळे त्यांची अंतर्गत रसायने बदलू लागते. मेंदूच्या पेशी विशिष्ट रेणू तयार करू लागतात. याला एमईजी 3 म्हणतात. या नेक्रोप्टोसिसमुळे मेंदूच्या पेशींचा मृत्यू होतो.
 
 
अल्झायमर्स डॉट ओआरजीने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, (Alzheimer cell) अमायलोईड हे एक असामान्य प्रथिन आहे. ते मेंदूमध्ये आढळते; परंतु अल्झायमर रोगात अमायलॉईड एकत्र चिकटून राहतात आणि वेगवेगळ्या आकाराच्या गुठळ्या तयार करतात. काही काळानंतर त्या मेंदूला हानी पोहोचवतात. टीएयून प्रथिनामुळे टाओओपॅथीमध्ये न्यूरोफिब्रिलरी टँगल्स म्हणून जमा होते. मेंदूमधून अमायलोइड काढून टाकणारी औषधे विकसित करण्यात अलिकडे यश आले आहे. ते मेंदूच्या पेशींचा नाश कमी करण्यास मदत करतात. अल्झायमरसाठी ही नवीन औषधे ‘टर्निंग पॉईंट’ म्हणून ओळखली जातात. याबाबत प्रोफेसर डी. स्ट्रोपर म्हणतात की, एमईजी 3 रेणू अवरोधित केल्याने मेंदूच्या पेशींचा मृत्यू थांबू शकतो. अल्झायमरवरील नवीन संशोधनामुळे या आजारावरील औषधांची संपूर्ण नवीन श्रेणी होऊ शकते. मात्र, यासाठी अनेक वर्षे संशोधन करावे लागेल.
 
नवीन उपचारांची दिशा देण्यास संशोधन उपयोगी
इंग्लंडमधील (Alzheimer cell) अल्झायमर रिसर्च संस्थेतील डॉ. सुसान कोल्हास यांनी म्हटले की, नवीन संशोधनातील निष्कर्ष प्रभावी आहेत; परंतु अद्याप सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. हा शोध महत्त्वाचा आहे. कारण, तो अल्झायमर आजारातील पेशींच्या मृत्यूच्या नवीन यंत्रणेकडे निर्देश करतो, ज्या आम्हाला पूर्वी समजत नव्हत्या आणि भविष्यात नवीन उपचारांची दिशा मिळण्यास या संशोधनाचा उपयोग होणार आहे.