शहरात गणरायाचे उत्साहात आगमन

    दिनांक :20-Sep-2023
Total Views |
रिसोड,
Ganaraya's दिंडी, ढोल ताशाचा निनाद ,गणपती बाप्पा मोरयाच्या गगनभेदी घोषणा, गुलाल व फुलांची उधळण करीत रिसोड शहरातील बाप्पाच्या भक्तांनी आपल्या घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अतिशय भक्तीपूर्ण आणि आनंदी वातावरणामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा १९ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटात केली. सकाळपासूनच भाविक भक्तांनी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गणपतीच्या दुकानाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आपल्या घरी बापाला नेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या उत्साहात होते.
 
dfsf
 
शहरातील सिविल लाईन भागातील दुकानांजवळ मोठी गर्दी दिसून आली. भक्तांनी बाप्पाला मोटर सायकलवर. ट्रॅक्टर मध्ये, ऑटो, कार मध्ये बसवून मोठ्या थाटात आपल्या घरी नेले व विधिवत पूजन करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. सायंकाळचे सुमारास पोलीस स्टेशन रिसोडची गणरायाची मिरवणूक शहरामध्ये आकर्षण ठरली.Ganaraya's पोलीसच्या व्हॅनवर विराजमान गणरायाची मूर्ती व त्यामागे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर व सर्व पोलीस कर्मचारी शिस्तीमध्ये चालत असताना शहरातील नागरिकांनी आणि दुकानदारांनी पोलीस स्टेशनच्या गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मिरवणुकीने गणपती नेणे सुरूच होते. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडली नाही.