श्री संत गजानन महाराजांचा ११३ वा समाधीदिन साजरा

    दिनांक :20-Sep-2023
Total Views |
शेगाव,
Shri Sant Gajanan Maharaj आज श्री गजानन महाराजांचा ११३ वा समाधीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थानच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
 
 
Shri Sant Gajanan Maharaj
 
सकाळी गणेश व वरूण यागाची पूर्णाहुती झाली. त्यानंतर श्रींच्या समाधी विषयावर कीर्तन झाले. आरती व महाप्रसाद वितरणानंतर शहरातून पालखी परिक्रमा करण्यात आली. Shri Sant Gajanan Maharaj उत्सवात ५२८ दिंड्या व १७ हजार २३० वारकरी व लाखावर भाविकांनी हजेरी लावली.