तभा वृत्तसेवा
विसापूर,
Social Commitment बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे घरगुती गणपती विराजमान करताना सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले गुड्डू शेख यांनी सर्वधर्म समभावाचा पायंडा रचत मित्र रवी कोट्टलवार यांच्या घरी काल 19 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. हा मान कोट्टलवार परिवाराने मुस्लिम समाजातील गुड्डू शेख यांना दिला.
विसापूर येथील रवी कोट्टलवार हे मागील अनेक वर्षांपासून आराध्य दैवत श्री गणेश मूर्तीची दरवर्षी घरी प्रतिष्ठापणा करतात.Social Commitment मात्र यावर्षी गणपती बाप्पा विराजमान करण्यासाठी गुड्डू शेख यांना पाचरण करून त्यांच्याकडून श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली गेली. सामाजिक सलोख्यासाठीचा त्याच्या प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे