जगातील एकमेव रणथंभोरचे त्रिनेत्र गणेश मंदिर

- संपूर्ण कुटुंब एकाच ठिकाणी

    दिनांक :20-Sep-2023
Total Views |
रणथंबोर, 
Trinetra Ganesha Temple : जेव्हा आपण हिंदू धर्मात ‘प्रथम गणेश’ म्हणतो, तेव्हा ते रणथंभोरचे त्रिनेत्र गणेश मानले जाते. राजस्थानातील रणथंभोर किल्ल्यात स्थित त्रिनेत्र गणेश मंदिर भगवान गणेश यांचे सर्वांत प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे, ज्याध्ये संपूर्ण कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आहे. हे मंदिर सवाई माधोपूरपासून सुमारे 12 कि.मी. अंतरावर असून, रणथंभोर किल्ल्याध्ये आहे. असे म्हटले जाते की, 1299 ध्ये रणथंभोर किल्ल्यात राजा हमीर आणि अलाउद्दिन खिलजी यांच्यात युद्ध झाले. युद्धाच्या काळात त्यांनी रणथंभोर किल्ल्यात अन्न व इतर आवश्यक वस्तूंनी गोदामे भरली.
 
Trinetra Ganesha Temple
 
बरेच वर्षे युद्ध चालू असल्याने गोदामांमधील साठलेल्या वस्तू संपत चालल्या. राजा हमीर देव हा गणपतीचा भक्त होता. त्याच रात्री गणपती राजा हमीर देव यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी आश्वासन दिले की, युद्ध लवकरच संपेल आणि उद्या सकाळपर्यंत सर्व उणीवा व सस्या संपतील. त्याच रात्री (Trinetra Ganesha Temple) रणथंबोर किल्ल्याच्या भिंतीवर गणेशजींची तीन डोळ्यांची मूर्ती स्थापन केली गेली. एक चत्कार झाला आणि युद्ध संपले तेव्हा गोदामे पुन्हा भरली. इसवीसन 1300 मध्ये राजा हमीर देव यांनी हे गणपतीचे मंदिर बांधले. जगातील हे एकमेव मंदिर आहे, जिथे तीन डोळ्यांची गणेशाची मूर्ती आहे. त्याने गणेशाची मूर्ती, रिद्धि सिद्धी (त्यांची पत्नी) आणि दोन मुले (शुभ, लाभ) यांच्यासमवेत मुषकाची मूर्ती (उंदीर, वाहन) ठेवली. त्रिनेत्र गणपतीचा तिसरा डोळा ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक आहे. हे संपूर्ण जगातील एकमेव असे मंदिर आहे, जेथे गणपती आपल्या संपूर्ण कुटुंबासह स्थापित आहेत.
 
पत्र लिहूनही देवाला सांगू शकता अडचण
मंदिरात जाणे शक्य नसल्यास लोक आपली अडचण पत्रात लिहून येथील पत्त्यावर पाठवतात. देशातील अनेक घरांमधून येथे श्रीगणेशाच्या नावाने पत्र येतात. कार्डवर पत्ता लिहिलेला असतो (Trinetra Ganesha Temple) श्रीगणेश, रणथंबोर किल्ला, जिल्हा सवाई माधवपूर (राजस्थान). पोस्टमनसुद्धा पूर्ण आदराने हे कार्ड त्रिनेत्र गणेश मंदिरात पोहोचवतात. त्यानंतर पुजारी आलेले कार्ड त्रिनेत्र गणेशाच्या चरणाजवळ ठेवतात. स्थानिक मान्यतेनुसार, या मंदिरातील श्रीगणेशाला निंत्रण पत्र पाठवल्यास सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात.