मृगजळाची नवी आवृत्ती

21 Sep 2023 14:17:13
दृष्टिक्षेप
-जगन्निवास अय्यर
विरोधक गेल्या 9 वर्षांत स्वतःसाठी निर्माण केलेल्या बदनामीच्या दलदलीत खोलवर बुडत आहेत. ज्या राजकीय पक्षांचे एकमेकांशी किंचितही वैचारिक साम्य नाही, ते एकत्र येण्याचे ढोंग करीत आहेत. यातील एकही पक्ष ना राष्ट्रीय पर्याय देण्याच्या स्थितीच आहे, ना स्वतःच्या राज्यापलीकडे जाण्यात यशस्वी ठरलेला आहे.
INDIA : निवडणुका तोंडावर आल्या आहेत. 2014 पासून सरकारविरोधी असल्याच्या नादात राष्ट्राच्या आणि राष्ट्राच्या संकल्पनेच्या विरोधात असलेल्या तमाम शक्तींचा विरोधी ऐक्याच्या नावाखाली एकत्र येण्याचा हा सण आहे. देशातील विविध राज्यांत सत्ता उपभोगत असलेल्या विरोधी पक्षांना केंद्रातून नरेंद्र मोदी सरकारची हकालपट्टी करून, आपली गमावलेली सत्ता कोणत्याही प्रकारे परत मिळवायची आहे. आजकाल विरोधी ऐक्याचा जो हंगामी जल्लोष ऐकू येत आहे आणि ज्यांचे हावभाव व्यासपीठांवर, रस्त्यावर आणि विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांमध्ये ऐकू येत आहेत, त्यांची भाषा हीच आहे. पण प्रकरण दिसते तितके साधे नाही. ज्या पक्षांचेे एकमेकांशी किंचितही वैचारिक साम्य नाही, ते एकत्र येण्याचे ढोंग करीत आहेत. त्यांना सुसंवादही राखता येत नाही, कारण विचार आणि विचारसरणी हे शब्दच त्यांच्या खीजगणतीत नाही. असे असतानाही या राजकीय पक्षांची युती होत आहे, तेव्हा त्यांच्या इतिहासाचा आणि युती करण्यामागील कारणांचा सखोल विचार करण्याची गरज आहे. प्रथम इतिहासावर एक नजर टाकूया. (INDIA) आय.एन.डी.आय.ए. (इंडिया) अलायन्सच्या नावाने इकडून-तिकडून एकत्र आलेली राजकीय कुळे, हा भारताच्या लोकशाही इतिहासात सत्तेबाहेर राहिलेल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांच्या जवळजवळ अंतहीन गाथेतील एक नवा अध्याय आहे. भूतकाळात वेळोवेळी, स्वराज पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक, 1951 ची किसान मजदूर प्रजा पार्टी, 1967 चे संविद (संयुक्त विधिमंडळ पक्ष) सरकार, संयुक्त आघाडी किंवा संयुक्त मोर्चा, जनता पक्ष, राष्ट्रीय आघाडी-डावी आघाडी, गैर-काँग्रेस गैर-भाजप तिसरा मोर्चा वगैरे नावांनी असे प्रयोग होतच आले आहेत.
 
INDIA
 
काँग्रेस विरुद्ध राजघराणे
या राजकारणाचा सार असा आहे की, काँग्रेस हा एक पक्ष आहे. (INDIA) नेहरू घराणे काँग्रेसमध्ये कायमस्वरूपी सूत्रधार होतेे, आहेे आणि राहील. यामुळे जो असंतुष्ट आहे, त्याला काँग्रेसमधून बाहेर काढून टाकले जाते किंवा जो आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरतो, तो छोट्या-मोठ्या विरोधी पक्षाचा नेता होतोे आणि विरोधकांवर स्वार होऊन सत्तेत येण्याचा प्रयत्न करतो. असे नेते वेळोवेळी स्वतःची काँग्रेस स्थापन करत आले आहेत. जसे यशवंतराव चव्हाण-ब‘ह्मानंद रेड्डी यांची चव्हाण-रेड्डी काँग्रेस, काँग्रेस-ओ, काँग्रेस-पी, काँग्रेसआर, भारतीय राष्ट्रीय लोकशाही काँग्रेस, सी. राजगोपालाचारी यांचा स्वतंत्र पक्ष, ओरिसा जन काँग्रेस बांगला काँग्रेस, उत्कल काँग्रेस, बिप्लोबी बांगला काँग्रेस, स्व. जगजीवन राम यांची काँग्रेस फॉर डेमोक‘सी, काँग्रेस-ए (ए.के. अँटनी), काँग्रेस-अर्स, काँग्रेस-सोशालिस्ट, आणखी एक जगजीवन काँग्रेस, सरतचंद्र सिन्हा यांची समाजवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस, अखिल भारतीय इंदिरा काँग्रेस (तिवारी), एस. बंगारप्पा यांचा कर्नाटक काँग‘ेस पक्ष, तमिळ राजीव काँग‘ेस, तामिळनाडू काँग‘ेस (पी. चिदंबरम), अरुणाचल काँग्रेस, अरुणाचल काँग्रेस (मिठी), गोवा राजीव काँग्रेस, अखिल भारतीय इंदिरा काँग्रेस (धर्मनिरपेक्ष), मध्य प्रदेश विकास काँग्रेस तामिळनाडू मक्कल काँग‘ेस, हिमाचल विकास काँग्रेस, मणिपूर राज्य काँग्रेस पक्ष, भारतीय जनता काँग्रेस, गोवा पीपल्स काँग्रेस, काँग्रेस जननायक पिरवाई (पी. चिदंबरम), तोण्डर काँग्रेस, पाँडिचेरी मक्कल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (शेख हसन), गुजरात जनता काँग्रेस, काँग्रेस (डोलो), पाँडिचेरी मुन्नेत्र काँग्रेस, डेमोक‘ॅटिक इंदिरा काँग्रेस (पी. करुणाकरन), एचजेके, प्रोग‘ेसिव्ह इंदिरा काँग्रेस, अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस छत्तीसगड जनता काँग्रेस, मक्कल मुन्नेत्र काँग्रेस, पंजाब लोक काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जन मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इ.
 
 
स्थानिक नेत्यांच्या (INDIA) किंवा क्षत्रियांच्या महत्त्वाकांक्षेमुळे सर्वांनी आपल्या मूळ काँग्रेस पक्षापासून फारकत घेतली आणि प्रत्येकाने स्वतःला ‘खरी काँग्रेस’ म्हणजे गांधी आणि नेहरूंच्या पक्षाचा योग्य वारस म्हणून घोषित केले. आपली घरे सोडलेल्या किंवा बहिष्कृत झालेल्या सर्व खर्‍या किंवा बनावट काँग्रेसजनांची एकंदर कहाणी, छाती ताणून बाहेर पडणे आणि त्यांच्या मूळ पक्षात परत येण्यासाठी गुडघ्यावर रांगणे अशी आहे. या कारणास्तव असे म्हणता येईल की, आज भारतात विरोधी पक्षाचे जे स्वरूप दिसत आहे, ते सारे मनाने काँग्रेसचेच आहेत, मात्र, काँग्रेसच्या राजघराण्याचे नेतृत्व त्यांना मान्य नाही. महाराष्ट्राचे माजी मु‘यमंत्री शरद पवार यांनी 1999 मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या परदेशी मूळाच्या मुद्यावरून वेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तो पक्ष अजूनही औपचारिकरित्या अस्तित्वात आहे. पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली तर आंध‘ प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेसची स्थापना केली, जे सध्या राजकारणात सकि‘य आहेत.
 
 
प्राणघातक केंद्र प्रतिकूल प्रवृत्ती
यापैकी एकही पक्ष राष्ट्रीय पर्याय देऊ शकत नाही. (INDIA) यापैकी एकाही पक्षाला स्वतःच्या राज्याच्या पलीकडे इतर कोणत्याही राज्यात विधानसभेच्या पाच जागाही मिळवण्याची क्षमता दाखवता आलेली नाही. गेल्या सात दशकात उगवलेल्या आणि अस्तंगत झालेल्या वर उल्लेखित ‘खर्‍या’ काँग्रेस पक्षांबाबत तर काही बोलायलाच नको. काही अनुभवी राजकीय निरीक्षकांना 1977 मधील जनता पक्षाचा विजय, हे विरोधी ऐक्याचे यशस्वी उदाहरण म्हणून मांडावेसे वाटेल, कारण जनता पक्ष ही विविध पक्षांची युती होती. परंतु या युक्तिवादाने वास्तव लपवता येणार नाही. कारण इंदिरा गांधी-संजय गांधी यांचे दहशतवादी सरकार उलथवून टाकून, केंद्रात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी राजवट आणण्यात भारतीय जनसंघाने निर्णायक भूमिका बजावली होती. जनसंघाने 100 हून अधिक खासदार लोकसभेत पाठवले होते, त्यामुळे जनता पक्षाला लोकसभेत बहुमत मिळवणे शक्य झाले. ते सरकार 1979 मध्ये अवघ्या अडीच वर्षांत कोसळले आणि इंदिरा गांधी सत्तेत परत येऊ शकल्या, जे केवळ भारतीय राजकारणातच नव्हे तर इतिहासातही केंद्रपुरक आणि केंद्र प्रतिकूल शक्तींमधील संघर्ष प्रतिबिंबित करते. या दोन्ही प्रवृत्ती त्यांच्या स्वतःच्या परिमाणांमध्ये अस्तित्वात आहेत.
 
 
त्यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केल्यास दोन्ही शक्तींचे स्वरूप समजू शकते. (INDIA) प्रत्येक शक्ती किंवा प्रवृत्ती राज्याला बळकट करते किंवा त्याचे विघटन करण्याचा प्रयत्न करते, हे आपण पाहू शकतो. भारतामध्ये प्राचीन सम्राट आणि विजेते श्री राम आणि श्री कृष्ण यांचा कालखंड तसेच भारतव्याप्त मौर्य, गुप्त, चोल, चालुक्य, पुष्यभूती, प्रतिहार, मराठा इत्यादी साम्राज्यांची निर्मिती हा मध्यवर्ती शक्तींच्या उदयाचा आणि वर्चस्वाचा काळ आहे.
 
 
आधुनिक युगातही कोणत्याही देशाच्या राजकारणात एक किंवा दोन प्रतिस्पर्धी शक्तींचा सहभाग असणे स्वाभाविक आहे. पण याकडे देशाच्या एकात्मतेतील गंभीर अडथळा म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. केंद्राला अनुकूल किंवा केंद्राला प्रतिकूल अशा दोन शक्तींमध्ये मर्यादित परस्पर संवाद असेल, तर प्रादेशिकतेसार‘या समस्या निर्माण होतात आणि देशातील लोकांमध्ये विषमता निर्माण होऊ शकते. यांच्यातील वाद टोकाला गेले तर देशाचे विघटन रोखणे कठीण होऊ शकते. 1947 मध्ये भारताचा स्वतःचा अनुभव काहीसा सारखाच होता. फाळणी आणि इस्लामिक अलगाववाद या घटनांचे स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तराचे असले तरी एक बाब स्पष्ट आहे की, केंद्राला प्रतिकूल असणार्‍या शक्तींपेक्षा केंद्राभिमुख शक्तींचे देशात वर्चस्व असायलाच हवे. जेव्हा एखाद्या देशात केंद्राभिमुख शक्ती अधिक सक्षम असतात, तेव्हा तो देश जागतिक आव्हाने आणि संघर्ष तसेच स्वतःच्या सीमेतील संघर्षांना तोंड देण्यासाठी मजबूत उभा राहू शकतो.
 
 
राष्ट्रवाद, (INDIA) म्हणजे एखाद्याचे देशाप्रती असीम प्रेम आणि निष्ठा; ही एक शक्तिशाली केंद्राभिमुख शक्ती असून, ती लोकांमध्ये एकता निर्माण करते. सांस्कृतिक क्षेत्रात, केंद्राभिमुख शक्ती ही सर्वात शक्तिशाली आहे, जी सर्वांना जवळ आणते. नेपाळ आणि भारतीय नागरिकांना हिंदू धर्मच एकत्र आणतो, हिंदुत्वाचे अनुयायी आपापसात एकतेच्या भावनेचा अनुभव घेतात. ज्यूंच्या मातृभूमीत नवीन जीवन शोधणार्‍या जागतिक स्थलांतरितांच्या लाटेला एकत्र करण्यासाठी आधुनिक हिब‘ू इस्रायलची निर्मिती केली गेली.
 
 
नवीन राष्ट्राचा उदय
या (INDIA) दृष्टिकोनातून, मे 2014 मध्ये भारत एक नवीन राष्ट्र म्हणून उदयास आले. संपूर्णपणे नवीन राजकीय नेतृत्वासह, राष्ट्राने आपला भूतकाळातील निष्कि‘य आणि अकर्मण्य दृष्टीकोन सोडला आणि अनेक शतकांपूर्वीचा स्थिर, गतिमान आणि सकि‘य दृष्टीकोन स्वीकारला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी भारताच्या केंद्राभिमुख शक्तींचे वर्चस्व प्रतिबिंबित झाले. थोडक्यात, तीन दशकांनंतर भारताला स्पष्ट बहुमत असलेल्या आणि राष्ट्राच्या सभ्यता, संस्कृती आणि धर्मावर निष्ठा असलेल्या राष्ट्रवादी पक्षाने एक स्थिर आणि मेहनती शासन मिळाले. आजचा भारत 2025 पर्यंत जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या प्रयत्नात पुढे जात आहे आणि केवळ एका दशकापूर्वी गृहीत धरल्या जाणार्‍या गलितगात्र देशांच्या रांगेत उभ्या असलेल्या देशांपेक्षा जगातील आघाडीच्या शक्तींमध्ये त्याची आज गणना होत आहे.
 
 
गेल्या नऊ वर्षांचा हा प्रवास सोपा नव्हता. बदल आणि त्याची स्वीकृती नेहमीच त्याच्या अंगभूत समस्यांसह येते. राष्ट्रीय स्तरावर राजकीय नेतृत्वात झालेला बदल देशाच्या मोठ्या वर्गाने मोठ्या उत्साहाने स्वीकारला. (INDIA) मात्र, मतदारांच्या काही घटकांना आणि बहुतांश विरोधी पक्षांना हे पचवता आलेले नाही आणि पचवता येणारही नाही. 2014 पासून सत्तेबाहेर राहिल्याने ते पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखे तडफडून राहिले आहेत. संसदेत अजूनही विरोधकांसाठी निश्चित केलेल्या जागेवर बसणे त्यांना जड जात आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चिघळले आहे, ते सतत निम्न स्तरावर जात आहे. भारताच्या समृद्ध वारशातून प्रेरणा घेऊन भारतीय मूल्ये आणि ज्ञानावर आधारित प्रशासन आणि विकासाचे मॉडेल स्वीकारण्याचा भाजप नेतृत्वाचा आक‘मक संकल्प विरोधकांना अधिक त्रासदायक ठरत आहे. विकृत धर्मनिरपेक्षता आणि त्यांच्या अल्पसं‘यक व्होटबँकेत गेल्या काही वर्षांत केलेल्या संदिग्ध राजकीय गुंतवणुकीमुळे त्यांच्या मृत्यूची घंटा वाजणार आहे. त्यांच्या भूतकाळातील राजकीय गुंतवणुकीमुळे त्यांची कायम बदनामी झाली.
 
 
विरोधकांची, विशेषत: काँग्रेस पक्षाची निराशा अशा पातळीवर आहे की, त्यांचे नेते भाजपला पराभूत करण्यासाठी आणि भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करण्यासाठी परदेशात मदतीची भीक मागायची लाजही त्यांना वाटेनाशी झाली आहे. विरोधी छावणीत विश्वासार्ह नेतृत्वाचा अभाव आहे. काँग्रेस पक्षाला राहुल गांधींबाबत अंधविश्वासाने ग्रासले आहे. विरोधी पक्षातील नेतेही त्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाहीत. (INDIA) विरोधी पक्षाचे तथाकथित नेते भारताच्या बाजूने आहेत की विरोधात, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, जगनमोहन आणि इतरांच्या अनेक राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आहेत. पश्चिम बंगालच्या बाहेर ममतांना एकही जागा मिळू शकत नाही, आणि त्या कोणाच्या उपयोगीही पडू शकत नाहीत. स्टॅलिन, नितीश, लालू आणि अखिलेश यांचीही तीच स्थिती आहे. त्यांच्यापैकी बहुतेक नेते त्यांच्याच प्रदेशात टिकून राहण्यासाठी धडपडत आहेत. राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही, त्यांच्या पोषित माध्यमांनी ‘मराठा स्ट्राँगमॅन’, ’चाणक्य’ इत्यादी उपाधी बहाल केलेल्या शरद पवारांना महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 9 पेक्षा जास्त जागा कधीच मिळवता आलेल्या नाहीत आणि आज त्यांना पक्षाची वाताहत झालेली बघावी लागत आहे. महापालिका पातळीवरील राजकारणात आणि आपापल्या राज्यातही ज्यांचा एकहाती प्रभाव नाही, अशा कुटील मंडळींच्या मदतीने पंतप्रधान मोदींना कोंडीत पकडण्याचे स्वप्न सारे विरोधक पाहत आहेत.
 
 
विरोधक आधीच लढत हरल्याचे दिसत आहे. (INDIA) राजकीय आणि राष्ट्रीय पातळीवर भाजपचा मुकाबला कसा करायचा, याचेही उत्तर त्यांच्याकडे नाही. विरोधी पक्षांचे बहुतेक प्रवक्ते टीव्हीवरील महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्यांवरील चर्चेदरम्यान निरर्थक आणि निष्फळ बडबड करताना दिसतात. कळीच्या मुद्यांवर पक्षीय धोरणांचा अभाव त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे वाचता येतो. देशाच्या निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विरोधकांचा टोकाचा द्वेष कोणत्याही सामान्य नागरिकाच्या समजण्यापलीकडचा आहे. पंतप्रधान आणि भाजपचा द्वेष आणि अपमान करण्याची विरोधकांची मजबुरी चिंताजनक आहे, कारण ती आता स्पष्टपणे देशविरोधी आणि काही वेळा हिंदुविरोधी मानसिकता आणि कृतींमध्ये बदलली आहे. सरकारला विरोध करण्याचा उद्देश जर भारताची अवनती करणे आणि भारताच्या भविष्यावर शंका उपस्थित करणे असेल, तर त्यासाठीही विरोधक उपलब्ध आहेत. पंतप्रधान मोदींना जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्राकडून राजनैतिक सन्मान आणि आदरातिथ्य दिले गेले तर विरोधी पक्ष या वास्तवावर आनंद मानण्याऐवजी भारत, भाजप आणि जगभरातील हिंदूंचा निषेध करणार्‍यांशी हातमिळवणी करीत आहेत.
 
 
कोविड महामारी, युक्रेन युद्धात पंतप्रधान मोदी आणि (INDIA) भारतावर तारणहार अशी स्तुतिसुमने उधळली जात असतानाही विरोधक ते मान्य करण्यास तयार नाही. विरोधी पक्ष केवळ सरकारच्या हेतूवरच नव्हे तर त्याच्या प्रचाराशी जुळणारी तथ्ये आणि आकडेवारीवरही शंका घेतात. विरोधी पक्ष संसदेत कोणतेही योगदान देत नाहीत. विरोधी पक्षाचे खासदार अनेकदा क्षुल्लक बाबींवर गदारोळ करून संसदेचा आणि देशाचा वेळ वाया घालवतात. एकीकडे त्यांचा स्वार्थी अजेंडा पुढे नेण्याचा आणि दुसरीकडे सरकारला आणि देशाला लाजवेल असा त्यांचा हेतू आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेली भारतीय राजकारण आणि शासनाची विषाक्त वैशिष्ट्ये असलेली अल्पसं‘याक तुष्टीकरणाची धोरणे संपवणे, हे भारतासमोरील महत्त्वाचे राष्ट्रीय आव्हान आहे. बेईमान राजकारणी आणि समाजाच्या नेत्यांनी स्वार्थी कारणांसाठी समाजातील मोठ्या घटकांना जाणीवपूर्वक विकास प्रकि‘येपासून दूर ठेवले. बहुसं‘यकांची ओळख आणि आवाज जाणीवपूर्वक दडपले गेले.
पांञ्चजन्यहून साभार
Powered By Sangraha 9.0