द्रमुकचा सनातन विरोध

21 Sep 2023 14:42:23
वर्तमान
- सुभी विश्वकर्मा
 
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि स्वत: राज्याचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे, असे उद्गार काढल्यानंतर प्रचंड संताप निर्माण झाला. सनातन धर्माची डास, डेंग्यू, मलेरिया, ताप आणि कोरोना यांच्याशी बरोबरी करून, त्यांनी द्रमुकचा हिंदुविरोधी अर्थात सनातन विरोधी चेहरा उघड केला आहे.
 
 
Udayanidhi Stalin : 2 सप्टेंबर रोजी तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनने चेन्नई येथे सनातनम् (सनातन धर्म) अबोलिशन कॉन्क्लेव्ह (सनातन धर्माच्या विनाशासाठी परिषद) आयोजित केली होती. सनातन धर्म नष्ट करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आय.एन.डी.आय.ए.चे (इंडियाचे) जवळपास सर्व सदस्य या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होते. या कॉन्क्लेव्हमधील एका वक्त्याचे वादग‘स्त विधान सध्या इंटरनेटवर फिरत आहे.
 
Udayanidhi Stalin
 
वादग्रस्त भाषण आणि वक्त्याचा परामर्श घेण्यापूर्वी, या कॉन्क्लेव्हमध्ये आमंत्रित केलेल्या वक्त्यांची यादी आपण पाहू या. निमंत्रितांमध्ये द्रविडार कळघमचे के. वीरामणी, (Udayanidhi Stalin) द्रमुकचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, राधिका वेमुला (रोहित वेमुलाची आई), भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य मधुक्कुर रामलिंगम, लिबरेशन पँथर्स पार्टीचे टी.एल. थिरुमावलावन, काँग्रेसचे पीटर अल्फोन्स, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एस. वेंकटेशन, तामिळनाडू पुरोगामी लेखक संघटनेचे अध्वन देचन्या आणि द्रमुक मंत्री पोनमुडिया यांचा समावेश होता.
 
 
सनातन धर्माविरुद्ध अपमानजनक टिप्पण्या
कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना द्रमुकचे अध्यक्ष एमके (Udayanidhi Stalin) स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, ‘‘सनातन धर्माच्या निर्मूलनासाठी या संमेलनात मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. संमेलनाचे नाव सनातन धर्माचा विरोध करा, असे ठेवण्याऐवजी ‘सनातन धर्माचे निर्मूलन करा’ असे ठेवल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो.’’
‘‘समाजात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे निर्मूलन आपल्याला करायचे आहे. त्यामुळे आपण त्यांना केवळ विरोध करू शकत नाही. डास, डेंग्यू, ताप, मलेरिया, कोरोना या सर्व अशा गोष्टी आहेत, ज्यांना आपण निव्वळ विरोध करू शकत नाही, आपण त्यांचे निर्मूलनच केले पाहिजे. सनातनम् देखील असेच आहे. सनातनला केवळ विरोध न करता त्याचे निर्मूलन करणे, हे आपले पहिले काम असले पाहिजे.’’
‘‘सनातनम् म्हणजे काय? सनातनम् हे नावच संस्कृतमधून आले आहे. सनातन धर्म समता आणि सामाजिक न्यायाला विरोध करतो. सनातनम्चा अर्थ काय आहे? शाश्वत किंवा बदलता येणार नाही असे काहीतरी.’’ हा सनातन धर्माचा अर्थ त्यांनी पुढे जोडला.
 
 
ते पुढे म्हणाले, ‘‘रामायण आणि महाभारत ही लोकांची कला आणि साहित्यकृती मानली जात होती. द्रविड आणि
कम्युनिस्ट चळवळीनंतरच तिरुक्कुरल, सिलप्पाधिकारम, मणिमेकलाई इत्यादींबद्दल लोकांना सांगितले गेले.’’
‘‘सनातनम्ने लोकांना जातीनुसार विभाजित करा आणि त्यांना वेगळे करा असे सांगितले. पण आमच्या कलैगनारने प्रत्येक समाजाला एका गावात आणले आणि सनातनम्ला चपराक देत ‘समथुवपुरम’ हे नाव दिले,’’ असे उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितले.
 
 
द्रमुकची हिंदूविरोधी वृत्ती
सनातन निर्मूलन परिषद आणि पुरोगामी लेखक-कलाकार संघटनेच्या या कॉन्क्लेव्हबाबत सत्ताधारी द्रमुकने बाळगलेल्या मौनाकडे विविध बातम्यांमध्ये लक्ष वेधण्यात आले आहे. अशा संमेलनांना परवानगी दिल्याने सनातनच्या जीवनपद्धतीबाबत समाजमनात पद्धतशीरपणे विष पेरले जाईल आणि त्यामुळे बहुसं‘य लोकांचा अपमान होईल. या परिषदेमुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाचा हिंदुत्वाला असलेला विरोध आणि त्याबाबत असलेला पूर्वग‘ह जगजाहीर झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सनातनविरोधी परिषदेची घोषणा एका गडद पार्श्वभूमीच्या विदेशी वैचारिक अनुयायांच्या गटाने केली होती. (Udayanidhi Stalin) तामिळनाडूत सनातन धर्म आणि त्याच्या मार्गावर चालणार्‍या लोकांसाठी कोणतीही सुरक्षा राहिलेली नसून, ही परिषद या राज्यात निर्माण झालेल्या धोकादायक स्थितीवर प्रकाश टाकते. सर्वोच्च मानवी धर्माचा गौरव करणार्‍या सनातन विरोधातील हे अधिवेशन म्हणजे उघड धार्मिक विद्वेष आहे. खरे तर या परिषदेमुळे बाधित झालेल्या बहुसं‘य लोकांनी या विरोधात सनातन जागृती परिषद आयोजित करण्याची गरज आहे.
 
 
सनातन धर्म परिषद निर्मूलन करा
चशवळूररप.लेा च्या वृत्तानुसार, परिषदेचे नेतृत्व अया वैकुंदर, नारायणा गुरू आणि इयान काली करीत आहेत. ते स्वत:ला सनातनचे सुधारक म्हणवून घेतात आणि सनातन निष्ट करण्याच्या संकल्पनेवर काम करतात. द्रमुकच्या राजवटीत ते आणि त्यांच्या हिंदूविरोधी विचारांची भरभराट होत आहे. पुढे जाण्यापूर्वी या कॉन्फरन्सच्या कार्यक्रम पत्रिकेबद्दल जाणून घेऊ या!
- सनातनचा प्राणघातक इतिहास (सनातन धर्म)
- सनातन आणि महिला
- तमिळ नॉर्म्स आणि सनातन
- जातीचा सिद्धांत आणि षडयंत्र सिद्धांत
- तमिळ संगीत आणि सनातन
- सनातन लादणे आणि प्रसारमाध्यमांचा विरोध
-सनातन धर्माच्या राजकारणाला अथवा अध्यात्मिकतेला विरोध करण्याचा मार्ग कोणता?
- राजकारण किंवा अध्यात्म
- सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आयुधे
 
‘‘मी काही दिवसांपासून पाहतोय् की, तुम्हाला (आय.एन.डी.आय.ए. कोलिशन) सत्ता हवी आहे, पण कोणती किंमत देऊन? दोन दिवस तुम्ही या देशाच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि सनातन धर्माचा अपमान केला आहे. इंडिया आघाडीचे दोन प्रमुख पक्ष, द्रमुक आणि काँग‘ेस. त्यांचे ज्येष्ठ नेते - एक माजी अर्थमंत्र्यांचा मुलगा आणि (Udayanidhi Stalin) दुसरा मुख्यमंत्र्यांचा मुलगा - सनातन धर्म संपला पाहिजे, असे म्हणत आहेत. मला सांगा, तुम्ही सनातन धर्म संपवायला तयार आहात का?’’
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
 
 
‘‘स्टॅलिनचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन म्हणतात की, ‘सनातन धर्म’ संपवला पाहिजे. ते म्हणतात की, डेंग्यू आणि मलेरियाप्रमाणे ‘सनातन धर्म’ नाहीसा झाला पाहिजे. अशी विधाने करताना त्यांना कोणताही संकोच होत नाही. उदयनिधी यांचे विधान आय.एन.डी.आय.ए. युतीची राजकीय रणनीती आहे का ? आगामी निवडणुकांमध्ये तुम्ही या (Udayanidhi Stalin) हिंदूविरोधी रणनीतीचा वापर करणार आहात का? तुम्ही अनेक वेळा सिद्ध केले आहे की, तुम्हाला आमच्या देशाशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार वाटतो आणि तुमची ‘मोहब्बत की दुकान’ समाजात द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे.’’
- जेपी नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप
 
 
‘सनातन धर्म’ हा शब्द ख्रिश्चन धर्म किंवा इस्लामिक धर्म अस्तित्वात येण्यापूर्वीही होता. (Udayanidhi Stalin) सनातन धर्म म्हणजे शाश्वत, कालातीत धर्म. जो या मातीत अनेक काळापासून रुजला आहे. उदयनिधी जे बोलले, त्याचा देशातील 142 कोटी लोकांनी निषेध केला पाहिजे; कारण यामुळे एका विशिष्ट धर्माबद्दल द्वेषभावन पसरवली गेली. ते जाणीवपूर्वक तयार केलेल्या मजकुरातून भाषण वाचत होते. एका विशिष्ट संस्कृतीच्या निर्मूलनाला वंशसंहार म्हणतात. सनातन धर्म संपवण्याची भाषा बोलणारे उदयनिधी स्टॅलिन आहेत तरी कोण?
- अण्णामलाई, प्रदेश भाजप अध्यक्ष, तामिळनाडू
 
 
उदयनिधी स्टॅलिन यांचे विधान, भाषा आणि त्यामागचा हेतू बघून मी हैराण झालो आहे. अहंकाराने भरलेल्या, सत्तेमुळे मदमस्त झालेल्या उदयनिधी यांनी अशी विधाने करण्यापूर्वी आपल्या सामर्थ्याचा विचारही केला नाही. जे ‘सनातन’ नष्ट करण्याची भाषा बोलतात, ते स्वतःचा नाश ओढवून घेतात. अशी विधाने करू नयेत, असे आव्हान मी त्यांना देत आहे. याचे परिणाम त्यांच्यासाठी गंभीर असतील.
- आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष, विहिंप
 
 
काँग्रेसचा सहयोगी पक्ष द्रमुक सनातन धर्माचा अपमान करीत आहे. ते म्हणतात की, (Udayanidhi Stalin) सनातन धर्म नाहीसा झाला पाहिजे. आय.एन.डी.आय.ए. कोलिशनमधील सहयोगी पक्षांनी याबाबत मौन धारण केले आहे. गेहलोत जी गप्प का ? आणि सोनिया जी गप्प का? काँग्रेस आणि इंडिया अलायन्सने याबाबत माफी मागावी.
- राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षण मंत्री
 
 
थिरू उदयनिधी (Udayanidhi Stalin) यांचे सनातन धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे, हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. या देशातील कोट्यवधी लोक कमी अथवा जास्त प्रमाणात सनातन धर्माच्या तत्त्वांचे पालन करतात. ही धक्कादायक बाब आहे की, एका जबाबदार राजकारण्याने असे पूर्णपणे अस्वीकार्य विधान करायला नको. भव्य तमिळ संस्कृतीबद्दल मला सर्वात जास्त आदर आहे. पण माझा थिरू उदयनिधी यांनी केलेल्या विधानावर तीव‘ आक्षेप आहे.
-डॉ. करण सिंह, राज्यसभेचे माजी सदस्य
 
 
ऑर्गनायझरहून साभार
Powered By Sangraha 9.0