वसुधैव कुटुंबकम्चे धडे

21 Sep 2023 14:49:55
विचार विनिमय
 
महोपनिषदात खालील श्लोक आहे...
अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥
 
 
Vasudhaiva Kutumbakam : याचा अर्थ, हे माझे स्वतःचे आहे आणि ते माझे नाही (किंवा दुसर्‍याचे आहे) असा विचार संकुचित विचारसरणीचे लोक करतात, उदार अंतःकरणाच्या लोकांसाठी, संपूर्ण जग हेच एक कुटुंब आहे. अलीकडेच नवी दिल्ली येथे भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 परिषद यशस्वीरित्या पार पडली. या परिषदेची संकल्पना वसुधैव कुटुम्बकम् या तत्त्वाशी जोडलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जी-20 परिषदेला एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही जागतिक दृष्टी दिली. सोबतच पुढील परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलकडे सुपूर्द करण्यात आले. दिल्लीत दोन दिवसीय शिखर परिषदेचा समारोप झाला. परिषदेत आफि‘कन युनियनला जी-20 मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आले, ही या आयोजनाची सर्वात मोठी उपलब्धी आहे.
 
Vasudhaiva Kutumbakam
 
जी-20च्या दिल्ली घोषणा पत्राने सर्व देशांना प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वासह आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे आणि असे म्हटले आहे की, संघर्षांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी संवाद आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे. या परिषदेत युक्रेनमधील युद्धासाठी रशियाचा निषेध करण्यात आला नाही, परंतु एकमेकांविरुद्ध बळाचा वापर करण्यापासून परावृत्त होण्याचे आवाहन केले गेले. (Vasudhaiva Kutumbakam) जी-20 परिषदेत भारत, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपियन युनियनमध्ये भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरच्या स्थापनेसाठी एक समझोता करार (एमओयू) करण्यात आला. रेल्वे आणि शिपिंग लिंक्सच्या आर्थिक कॉरिडॉरचे उद्दिष्ट भारत, मध्य पूर्व आणि युरोपमधील व्यापाराला चालना देण्याचे आहे, ज्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेच्या एक तृतीयांश भागावर होऊ शकतो. याशिवाय बि‘टनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी विकसनशील देशांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ग्रीन क्लायमेट फंडला 2 अरब डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले.
 
 
एकूणच जी-20 शिखर परिषद (Vasudhaiva Kutumbakam) केवळ यशस्वीच झाली नाही तर या परिषदने भारताची जागतिक पत उंचावली आहे. जागतिक कल्याणाच्या दिशेने भारताने जी-20 अजेंडाचे नेतृत्व केले. जी-20 ही संयुक्त राष्ट्रांनंतरची सर्वात मोठी जागतिक संघटना आहे. दिल्ली परिषदेपर्यंत त्यात 19 मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश आणि युरोपियन युनियन यांचा समावेश होता. युरोपियन युनियनमध्ये 27 देशांचा समावेश आहे. याचा अर्थ 46 देश आधीच जी-20 चे सदस्य होते. 55 राष्ट्रांच्या आफ्रिकन युनियनचा समावेश झाल्यानंतर आता जी-20 मध्ये जवळपास अर्ध्या जगाचा भाग असलेल्या 101 देशांचा समावेश झाला आहे. या सर्व घडामोडींमुळे भारताच्या जी-20 अध्यक्षपदाने जागतिक नेतृत्वाच्या भूमिकेतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
 
 
आपली अर्थव्यवस्था, तांत्रिक पराक्रम आणि शाश्वत विकासासाठी वचनबद्धतेसह, भारताने जगाला एक नवीन दृष्टीकोन देऊ केला आहे, जो मूलत: सर्वसमावेशक आहे. स्वार्थ सर्वांच्या पलीकडे आहे आणि ही भावना सर्वत्र आहे. अशा परिस्थितीत भारताने आपली सांस्कृतिक ओळख अधोरेखित करून जागतिक कुटुंबाची संकल्पना देऊन जगाला आश्चर्यचकित केले. आंतरराष्ट्रीय व्यापार असो की इतर कोणतेही व्यवहार, सर्वांचे ध्येय जगाचे कल्याण हेच असले पाहिजे. शांतता, स्नेह आणि स्थैर्य यातूनच जगाला समृद्ध, आनंदी बनवता येईल. या जुन्या धड्याची पुनरावृत्ती करून भारताने केवळ सांस्कृतिक बांधिलकीच दाखवली नाही तर जी-20च्या भविष्यातील कार्याची दिशाही निश्चित केली, ज्यामध्ये (Vasudhaiva Kutumbakam) वसुधैव कुटुम्बकम हे तत्त्व कधीही विसरले जाणार नाही.
 
हिंदी साप्ताहिक भारतवाणीहून साभार
Powered By Sangraha 9.0