‘पवनारखारी’चा गणपती लय भारी!

गावाला आले जत्रेचे स्वरूप

    दिनांक :21-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोबरवाही, 
Pavanarkhari Ganpati : भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिध्दी असलेल्या पवनारखारी येथील गणेशोत्सवात यंदाही समुद्र मंथनाची स्वयंचलित नाविण्यपुर्ण झाकी तयार करण्यात आली आहे. येथील गणपतीच्या दर्शनाकरिता दूरवरून भाविकांची गर्दी उसळत असून यात्रेचे स्वरूप आले आहे.
 
Pavanarkhari Ganpati
 
पवनारखारी Pavanarkhari Ganpati येथील कै. मोहनलाल गोयंका यांनी 1939 मध्ये येथे गणपती उत्सवाची सुरूवात केली होती. ते तुमसर पंचायत समितीचे पहिले सभापती व परिसरातील पहिले जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर त्यांचे पुत्र स्व.महाबीर प्रसाद गोयंका यांनी महत्त्वपूर्ण योगदान देवून ही परंपरा पुढे नेली. आताही त्यांच्या वयाच्या 84 व्या वर्षीही गोयंका परिवारा तर्फे श्री गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाविण्यपुर्ण झाकी सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी सागर मंथन आणि नीळकंठ शिवजी दर्शन ही झाकी स्वयंचलीत साधनांच्या सहाय्याने सादर करण्यात आली आहे. झाकी सोबतच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची व्यंगचित्रे, सिंह गर्जना, नाचणारे अस्वल आदींचे सादरीकरण करण्यात आले आहे.
 
 
गणेश उत्सव काळात Pavanarkhari Ganpati पवनारखारी व परिसरातील गावात प्रत्येक घरी पाहुण्यांची गर्दी दिसते. मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या सिवनी आणि बालाघाट जिल्ह्यांतूनही पवनारखारी येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी भाविक येतात. यामुळे पवनारखारी गावात गणेशोत्सवाची ही सर्वात मोठी जत्रा भरत असून पोलिस प्रशासनाने सुध्दा चोख बंदोबस्त ठेवला आहे.