सोहम् आणि ग्रामीण प्रतिभा !

motivational speaker-chandrapur मातृभाषेत शिकवावे

    दिनांक :21-Sep-2023
Total Views |
 वेध
- संजय रामगिरवार
motivational speaker-chandrapur ज्यांना समाज डोळसपणे आणि तेवढ्याच सहानुभूतीने बघता येतो, समाजाच्या जाणिवा जपता येतात, असे समाजाभिमुख जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सध्या चंद्रपुरात सेवारत आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रपूरहून पोंभुर्ण्यापर्यंत जंगलाच्या मार्गाने सायकलिंग करीत असताना त्यांना सोहम् सुरेश उईके नावाचा विद्यार्थी भेटला. डोंगरहळदी (तु.) या लहानशा गावचा सोहम् जिल्हा परिषद शाळेतील आठव्या वर्गात शिकतो. motivational speaker-chandrapur ‘‘आठ घंटे अभ्यास केला पायजे, आठ घंटे झोपलो पायजे अन् जवळपास एक घंटा तरी आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारल्या पायजे. कारण मन ‘फ्रेश' झाला पायजे आणि माझ्या महितीतून आठवड्यातून एक सिनेमा पाहला पायजे....'' हे शब्दशः सोहम् याच्या तोंडून उत्स्फूर्तपणे आणि प्रचंड आत्मविश्वासाने निघालेले वाक्य आहे. motivational speaker-chandrapur तेही कुणासमोर तर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांसमोर!
 
 

motivational speaker-chandrapur 
 
 
एखाद्या ‘मोटिवेशन स्पीकर' किंवा ‘आयएएस' परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या निष्णात शिक्षकाने सांगावे अशा पद्धतीने सोहम् पोलिस अधीक्षकांशी गप्पा करीत होता. ही संपूर्ण चित्रफीत खुद्द परदेशी साहेबांनीच समाजमाध्यमांवर प्रसारित केली. अल्पावधीत ती सर्वत्र बघितली गेली आणि सोहम् सर्वांसमोर आला. motivational speaker-chandrapur ज्या वयात ‘आयएएस' काय असते याची कल्पनाही करता येत नाही, त्या वयात सोहम् हे सगळे बोलत होता. ‘‘ग्यान सगळीकडे असते, जेवढं भेटते तेवढं आपल्या डोक्यात फिट केले पायजे'' असे सांगणारा सोहम् त्यासाठी, ग्रामीण स्त्रिया जसे धान पाखडतात, म्हणजे धान वेगळे करतात आणि कचरा वेगळा करतात तसेच आपण ज्ञान तेवढे घेतले पाहिजे, असे उदाहरणही देतो. motivational speaker-chandrapur समाजच शहाणे करतो म्हणतात ते हे आहे. सोहम् ला  ‘यूपीएससी'ची परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी त्याला खूप वेळ असला तरी हा विचार या वयात येणे हेच या मुलातले वेगळेपण आहे. लसावि, मसावि, हडप्पा संस्कृती, बाबर आणि मुगल अशा विविध विषयांवर तो या भेटीत परदेशी साहेबांसोबत गप्पा करीत होता.
 
 
motivational speaker-chandrapur या साऱ्यात सोहम् याचा  निर्भीड, बिनधास्त आणि धैर्यपूर्ण संवाद आणि तेवढ्याच प्रेमाने प्रोत्साहन देत ते ऐकण्याचा परदेशी यांचा सहृदयपणा हाच या सवांदाचा ‘यूएसपी' आहे, असे म्हणावे लागेल. हा संवाद येथेच थांबला नाही, तर काही दिवसांनी परदेशी यांनी सोहम्, त्याचे वडील, आई आणि सोहम्चे मार्गदर्शक त्याचे मामा यांना आपल्या कार्यालयात बोलवून त्यांचा सत्कार केला. एव्हाना सोहम् ला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विवेक जान्सन यांनी तर त्याला चक्क आपल्या खुर्चीवर बसवले. खरे तर, सोहम् हा केवळ एक विद्यार्थी नाही, तर तो ग्रामीण प्रतिभेचे प्रतिनिधित्व करतो. motivational speaker-chandrapur आपल्या मातृभाषेत शिक्षण घेऊनही विद्यार्थी आपल्या भविष्याच्या दिशेने दमदारपणे वाटचाल करू शकतो, हे सांगण्यासाठी हे प्रातिनिधीक उदाहरण पुरेसे म्हणता येईल. पण केवळ एक सोहम् शोधून चालणार नाही. तर मराठी माध्यमांच्या शाळा, तेथील मातृभाषेत शिकणारी प्रतिभा ओळखून ती जपण्याची गरज आहे. किमान पाचव्या वर्गापर्यंत तरी विद्यार्थ्याच्या मातृभाषेत शिकवले गेले पाहिजे.
 
 
कारण त्या वयात तो जेवढे त्यांच्या मातृभाषेतून समजू शकतो, तेवढे इंग्रजीतून समजू शकत नाही. शाळेत जाण्यापूर्वी तो कुत्र्याशी खेळतो आणि म्हणून तो प्राणी कुत्रा आहे हे त्याच्या डोक्यात घट्ट बसले असते. motivational speaker-chandrapur पण अवघ्या तीन वर्षात कॉन्व्हेंटमध्ये जाताच तो कुत्रा नव्हे, डॉग आहे म्हणून सांगितले जाते आणि त्याचा गोंधळ उडतो. ‘कॉन्व्हेंट'च्या विद्यार्थ्यांना दुकानात गेल्यानंतर ‘नाईंटीटीनाईन‘ला नव्याण्णव म्हणतात, हेही कळत नाही आणि व्यवहारातही गोंधळ उडतो. अशा गोंधळातच तो मोठा होता. कदाचित आपण रिसर्चमध्ये मागे राहण्याचे हे एक कारण असावे. चीन, फ्रान्ससारखे देश लहानपणापासूनच त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देतात आणि त्यांची प्रतिभा तेथूनच शोधालाही जन्म देते, असे वाटायला मोठा वाव आहे. motivational speaker-chandrapur नाही म्हणायला, नव्या शैक्षणिक धोरणात याचा विचार केला गेला आहे. बघू या, कितपत समाज हा नवा बदल स्वीकारते ते...!
९८८१७१७८३२