नशीब सुप्रिया सुळेचं आणि अजितदादाचं !

21 Sep 2023 20:11:50
प्रासंगिक 
 
 - मोरेश्वर बडगे
supriya sule-ajit pawar महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चांगलीच चर्चा रंगली. महिलांच्या हिताचा भावांनी विचार करावा असे अमित शाह म्हणाले. चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तो संदर्भ घेऊन केलेले विधान जोरदार चर्चेत आहे. supriya sule-ajit pawar आपल्या बहिणीचं चांगलं कल्याण व्हावं असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या घरात नसतो. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं, असं सुप्रियाताई म्हणाल्या तेव्हा त्यांच्या मनात कोण असेल हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. २०२४ च्या निवडणुकीचा महाराष्ट्रातला केंद्रबिंदू बारामती असेल. पवार कुटुंबातली चुलत भावंडं इथे अस्तित्वाची लढाई लढताना दिसतील. supriya sule-ajit pawar फुटलेल्या राष्ट्रवादीतले दोन्ही गट कायद्याची लढाई लढत आहेत. मात्र मनाने केव्हाच दूर निघून गेले आहेत. अजितदादा पवार राष्ट्रवादी फोडून ४० आमदारांसह भाजपा-शिंदे गट सरकारसोबत सत्तेत सामील झाले. supriya sule-ajit pawar सुरुवातीला काका-पुतण्याची ही मिलीभगत आहे असे बोलले गेले. पण आता स्पष्ट झाले आहे.
 
 
 
supriya sule-ajit pawar
 
 
पवार परिवारात तलवारी निघाल्या आहेत. भावाबद्दलची हीच खदखद महिला आरक्षणावर बोलताना सुप्रियातार्इंच्या तोंडून निघाली. मात्र आता खूप उशीर झाला आहे. supriya sule-ajit pawar बारामतीवरचा सत्तेचा सूर्य कधीच मावळत नाही असे गेली ५०-५५ वर्षे बोलले जात होते. पण आता सूर्य काय, पौर्णिमेच्या चंद्रालाही बारामती महाग व्हायला निघाली आहे. हे सारे टाळता आले असते. पण तशी कोणाची इच्छा होती? शरद पवारांनी २ मे रोजी आपण राजकारणातून निवृत्त होत आहोत असे जाहीर केले होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना निवृत्त होऊ दिले असते तर राष्ट्रवादी पक्ष फुटला नसता. पवारांना रिमोट कंट्रोल बनून पक्ष चालवता आला असता. पण सुप्रिया सुळे यांनी हे होऊ दिले नाही. supriya sule-ajit pawar अजितदादाच्या ताब्यात पक्ष जाईल अशी बहिणीला भीती वाटली. अशा वेळी एक बाप म्हणून पवारांना खंबीर भूमिका घेता आली असती. पण शरदरावही कन्यामोहात अडकले. त्यांनी सुप्रियाला कार्याध्यक्ष केले. इथेच गडबड झाली. अजितदादा अस्वस्थ झाले. आपल्या कुंडलीत फक्त उपमुख्यमंत्रिपदच लिहिले आहे का? या विचाराने त्यांच्यात बंडाचे बीज पेरले.
 
 
supriya sule-ajit pawar निवडणूक आयोगाने बंडखोरांच्या बाजूने निकाल दिला होता. उद्धव यांच्या हातून सत्ता गेली, धनुष्यबाणही गेला. आपल्या पित्यावरही अशी वेळ येऊ शकते ही भीती तेव्हा सुप्रिया सुळे यांना चाटून गेली होती. दीड वर्षापूर्वी भाजपाने लोकसभेसाठी मिशन १६० नक्की केले. हरलेल्या दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाच्या जागा टार्गेट करायचे ठरवले. त्यात भाजपाने महाराष्ट्रात बारामतीला रडारवर घेतले. निर्मला सीतारामन्, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या श्रेष्ठींचे दौरे बारामतीत वाढू लागले तेव्हा सुप्रिया सुळे यांना धोका लक्षात आला. supriya sule-ajit pawar आपला भाऊच आपल्याला फटाके लावणार या धास्तीने त्यांनी बापाच्याच पक्षात गटबाजी सुरू केली. भाजपाने अजितदादांना कशाला जवळ केले? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण दादांना जवळ घेणे हा भाजपाच्या रणनीतीचा एक भाग आहे. बारामतीमध्ये सुप्रियाला हरवायचे आहे या अटीवरच अजितदादांना भाजपाने जवळ घेतले. supriya sule-ajit pawar चार दिवसांपूर्वी अजितदादांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये बोलताना आपला गट महायुतीत निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले.
 
 
हे व्हायचेच होते. अजितदादांसाठी आता घरवापसीचे दोर केव्हाच कापले गेले आहेत. आता आपल्याला एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस या महायुतीसोबत राहून काकाशी दोन हात करायचे आहेत, हे वास्तव अजितदादांच्याही लक्षात आले आहे. supriya sule-ajit pawar बंडानंतर प्रथमच दादा बारामतीत गेले तेव्हा त्यांचे ज्या पद्धतीने स्वागत झाले ते पाहता दादा आपल्या काकाचे राजकारण मोडीत काढतील. दादा सोबत असल्याने काकाला बारामती सोपी जात होती. आता पिताश्रीही आपल्याला वाचवू शकणार नाहीत, हे सुप्रिया सुळे यांच्याही लक्षात येत असेल. पित्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर भाजपाकडून अभयदान मिळू शकते असे त्यांना मनोमन वाटते. उद्धवशी संबंध तोडा असा हेका त्यांनी पित्याकडे लावल्याची चर्चा कानावर येते. खूप काही घडणार-बिघडणार आहे. supriya sule-ajit pawar शरद पवारांना हवा सर्वात आधी कळते असे म्हणतात. तशी ती त्यांना कळलीही असेल. पण आता शरद पवार करू तरी काय शकतात? मुलीला वाचवायचे तर त्यांना बारामतीत तंबू टाकून बसावे लागेल. बारामतीत अडकून पडले तर मग इंडिया आघाडीचे काय? महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.
 
 
गेला तो काळ ! कामाला लागा म्हटल्यावर पवारांची माणसे कामाला लागत. आता फिरायचे म्हटले तर प्रत्येक जागी माफी मागत फिरावे लागणार. लोक माफ करतील याचा काय भरवसा? चुकीला माफी नाही. supriya sule-ajit pawar मुलीला वाचवायचे की इंडियाला? शरद पवारांचा हॅम्लेट झाला आहे. ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात १० वर्षे कृषिमंत्री होते. काय दिवे लावले? आता पाळी पवारांची आहे. त्यांना निर्णय करायचा आहे. इंडियात अडकून पडलो तर बारामती हातची जाते. मुलीला वाचवायचे म्हटले तर इंडिया सोडावी लागेल हे पवारांना छान कळते. पण उद्धव ठाकरेंचा पिच्छा कसा सोडायचा? तुम्ही लिहून ठेवा. पवार योग्य वेळी इंडियातून बाहेर पडणार. इंडिया सत्तेत येणार नाही, आली तरीही पवारांना कोणी पंतप्रधान व्हा असे म्हणणार नाही. नितीश कुमार, ममतादीदी, केजरीवाल, राहुलबाबा... टपून बसले आहेत. supriya sule-ajit pawar तशीही पवारांची किंमत  इंडियामध्ये पूजेच्या गणपतीच्या सुपारीसारखी आहे. पवार आयुष्यभर तळ्यात-मळ्यात खेळत आले. आता आयुष्याच्या संध्याकाळी ठोस भूमिका घेण्याचा प्रसंग नियतीने त्यांच्यावर आणला आहे.
Powered By Sangraha 9.0