भाजपाचे शिवणकर काँग्रेस पक्षात

22 Sep 2023 18:51:33
अर्जुनी मोरगाव, 
Arvind Shivankar : भाजपचे अरविंद शिवणकर यांनी आज शुक्रवारी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तालुक्यात त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला बळकटी तर भाजपाला धक्का बसला असल्याचे बोलले जाते.

Arvind Shivankar 
 
अरविंद शिवणकार Arvind Shivankar यांनी गत काळात भाजपचा कट्टर कार्यकर्ता ते पं. स. सभापती, जि. प. सदस्य, भाजप तालुका अध्यक्ष पद भेषविले आहे. त्यांनी त्यांचे निकटवर्तीय डॉ. लोणारे, विनय खोटेले या सहकार्‍यांसह आज 22 सप्टेबर रोजी शहरातील लक्ष्मी सहकारी भात गिरणीच्या सभागृहात आयोजीत कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष व सराकारतर्फे सतत जनविरोधी निर्णय घेतले जात असल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हाथ पकडल्याचे सांगीतले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, तालुकाध्यक्ष घनश्याम धामट, कार्याध्यक्ष प्रमोद पाऊलझगडे, चंद्रशेखर ठवरे, नगरसेवक सर्वेश भुतडा, जिप सदस्य श्रीकांत घाटबांधे, विजय राठोड, रवींद्र खोटेले, मोरेश्वर सोनवाने, पंस सदस्य फुलचंद बागडेरिया, संजय नाकडे, प्रितम रामटेके, तुलाराम खोटेले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0