देव्हाडा येथे माझी माती माझा देश कार्यक्रम

22 Sep 2023 18:47:23
मोहाडी,
Mazi mati Maza desh : तालुक्यातील ग्रामपंचायत देव्हाडा/बु. येथे माझी माती माझा देश कार्यक्रमांतर्गत अमृत शालेय विद्यार्थ्यांनी अमृत कलश घेऊन गावात प्रभातफेरी काढली. यावेळी गावातील घरोघरी जाऊन माती गोळा करण्यात आली. यावेळी सरपंच भारती कांबळे, उपसरपंच भाऊराव लाळे, ग्रा.प सदस्य किशोर रंगारी, ग्रामसेवक आर.के.वैद्य, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक पटले, रोजगार सेवक विजय बनसोड तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व नागरिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
Mazi mati Maza desh
 
Powered By Sangraha 9.0