पाळजच्या गणपतीला भाविकांची मांदियाळी

22 Sep 2023 20:31:51
हदगाव,
palaj-ganesh-yavatmal  नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज हे गाव तेलंगण सीमेलगत असून येथील गणपतीची स्थापना १९४८ ला करण्यात आली. तेलंगणातील निर्मल येथील कारागिराकडून लाकडी मूर्ती बनवून आणली होती. palaj-ganesh-yavatmal गणेश उत्सव काळात पाळज येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात पाच राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान अशी या गणेशाची ओळख आहे.
 
palaj-ganesh
 
१९४८ ला गावात प्लेग, गेस्ट्रो असे साथीचे रोग पसरले असता गणपती उत्सवात ही मूर्ती स्थापन करण्यात आली. तेव्हा ११ दिवसांत साथीच्या रोगावर नियंत्रण झाल्याचे सांगण्यात येते. palaj-ganesh-yavatmal या मूर्तीचे विसर्जन न करता दरवर्षी गणपती उत्सवाच्या काळात अकरा दिवस या मूर्तीची पूजा करायची या विसर्जन करायचे नाही, असे गावक-यांच्या वतीने ठरविण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत गणेश उत्सवाच्या काळात या सुंदर लाकडी मूर्तीची ११ दिवस पूजा केली जाते. palaj-ganesh-yavatmal 
 
 
palaj-ganesh-yavatmal त्यानंतर ही मूर्ती वर्ष भर कपाटात ठेवली जात त्यासमोर एक दुसरी गणपती मूर्ती ठेवण्यात येते त्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही हा गणपती ओळखला जातो. palaj-ganesh-yavatmal सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून, या ऐतिहासिक गणरायाचे दर्शन नक्कीच घ्यायला हवे. 
Powered By Sangraha 9.0