हदगाव,
palaj-ganesh-yavatmal नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज हे गाव तेलंगण सीमेलगत असून येथील गणपतीची स्थापना १९४८ ला करण्यात आली. तेलंगणातील निर्मल येथील कारागिराकडून लाकडी मूर्ती बनवून आणली होती. palaj-ganesh-yavatmal गणेश उत्सव काळात पाळज येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात पाच राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान अशी या गणेशाची ओळख आहे.
१९४८ ला गावात प्लेग, गेस्ट्रो असे साथीचे रोग पसरले असता गणपती उत्सवात ही मूर्ती स्थापन करण्यात आली. तेव्हा ११ दिवसांत साथीच्या रोगावर नियंत्रण झाल्याचे सांगण्यात येते. palaj-ganesh-yavatmal या मूर्तीचे विसर्जन न करता दरवर्षी गणपती उत्सवाच्या काळात अकरा दिवस या मूर्तीची पूजा करायची या विसर्जन करायचे नाही, असे गावक-यांच्या वतीने ठरविण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत गणेश उत्सवाच्या काळात या सुंदर लाकडी मूर्तीची ११ दिवस पूजा केली जाते. palaj-ganesh-yavatmal
palaj-ganesh-yavatmal त्यानंतर ही मूर्ती वर्ष भर कपाटात ठेवली जात त्यासमोर एक दुसरी गणपती मूर्ती ठेवण्यात येते त्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही हा गणपती ओळखला जातो. palaj-ganesh-yavatmal सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून, या ऐतिहासिक गणरायाचे दर्शन नक्कीच घ्यायला हवे.