अकोला जिल्ह्यातील 70 गावांत दळणवळणाची होणार सोय

-90 कोटींच्या विविध 22 कामांचा शुभारंभ
-आ. रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांना यश

    दिनांक :23-Sep-2023
Total Views |
अकोला,
MLA Randhir Savarkar : अकोला पूर्व मतदार संघातील रस्ते विकासासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी कधीचाचा पुढाकार घेतला आहे. आता त्यांच्या प्रयत्नांना भरपूर यश मिळाले असून त्यांच्या मतदार संघात 90 कोटी रूपये खर्चांच्या 22 विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. अकोला पूर्व विधान सभा मतदार संघात त्यांच्या विशेष प्रयत्नाने अर्थसंकल्पीय निधी, केंद्रीय रस्ते विकास निधी तसेच नाबार्ड मधून 2023-24 अंतर्गत 90 कोटी रुपयांच्या विविध 22 कामांचा भूमिपूजन सोहळा खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात होत आहे. MLA Randhir Savarkar आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून सत्तर गावांना दळणवळणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी उपरोक्त निधी उपलब्ध करून दिला आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आ.सावरकर यांचा पुढाकार असतो.
 
MLA Randhir Savarkar
 
आपल्या मतदार संघातील 70 गावांना वरदान MLA Randhir Savarkar ठरणार्‍या रस्त्यांचे कामाचा शुभारंभ कार्यकर्त्यांसोबत तसेच ठिकठिकाणचे सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी तसेच भाजपा पदाधिकारी महायुतीतील पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन आमदार सावरकर करणार आहेत. अकोला मरोडा ते दिनोडा ग्रामीण रस्ता, अकोला जिल्ह्यातील लोंतखेड पोच रस्त्याची सुधारणा करणे, अकोला जिल्ह्यातील रुईखेड-पणज- सावरा बाम्बर्डा - कुटासा - दहीहांडा रस्ता (बाम्बर्डा ते कुटासा) रस्ता सुधारणा करणे, मूर्तिजापूर, दहिगांव, सांगळूद, गुडधी, उमरी अकोला रस्ता सुधारणा करणे, यात दहिगांव ते धोतर्डी, ते सांगळूद रस्ता सुधारणा, मार्गावरील साखळी येथे स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे, तसेच याच मार्गावर विविध रस्त्यांची दुरूस्ती करणे, म्हैसांग, रामगांव, दहिगांव गावंडे, पळसो जं., अन्वी मिर्झापूर, बोरगांव मंजू यातील रस्त्याचे रूंदीकरण व मजबुतीकरण करणे.
 
 
शिवाय अकोला जिल्ह्यातील गोणापूर, दापुरा, मजलापूर, रामगांव, कौलखेड जहाँ. मध्ये रस्ता रूंदीकरणासह सुधारणा करणे, यातच कुंभारी विझोरा रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, कुंभारी विझोरा रस्त्याची सुधारणा करणे, मलकापूर, येवता, कानशिवणी, मोरगांव संरक्षण भिंत व पोच मार्गासह लहान पुलाचे बांधकाम करणे, MLA Randhir Savarkar अकोला जिल्ह्यातील किनखेड, दहीहांडा, दर्यापूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, अकोला जिल्ह्यातील मरोडा रस्त्याची सुधारणा करणे , चोहट्टा ते टाकळी बु. ते देवर्डा 9 रस्त्यांची सुधारणा करणे, आकोट - अकोला रामा ते देवरी मार्गाची सुधारणा करणे, भांबेरी - मनब्दा - पारळा रस्ता रस्त्याची सुधारणा करणे, अकोला जिल्ह्यातील हनवाडी रस्त्याची सुधारणा करणे. ही सर्व कामे या निधीतून होणार आहेत. या सर्व कार्यक्रमात त्या-त्या गावातील नागरिकांनी व सरपंच, उपसरपंच आदींनी उपस्थित राहावे अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील मागटे, जयंत मसने, विजय अग्रवाल राजेश नागमते अंबादास उमाळे राजेश रावणकर अशोक गावंडे संतोष शिवरकर सह सरपंच, उप सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता, केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व विकास होणार्‍या गावातील समस्त गावकरी मंडळी यांनी केली आहे.