बुलडाणा,
Sanjay Gaikwad स्वच्छता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्वच्छतेमुळे आपले आरोग्य सुदृढ राहून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवून गावाचा शाश्वत विकास साधता येऊ शकतो. यासाठी गावातून कचर्याला हद्दपार करणे गरजेचे आहे. अमृत कलश यात्रेच्या निमित्ताने शासनाच्या या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग देऊन कचरा मुक्त गाव भारत ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन आ. संजय गायकवाड यांनी केले.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता रन व ग्रामपंचायत विभागामार्फत अमृत कलश यात्रेचे आयोजन ग्रामपंचायत सिंदखेड तालुका मातळा येथे पार पडले यावेळी आ. संजय गायकवाड उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी सरपंच प्रवीण कदम, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समाधान वाघ हे उपस्थित होते. केंद्र शासनामार्फत मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत केले जात आहे.Sanjay Gaikwad मोताळा तालुक्यातील याचाही शुभारंभ सिंदखेड येथून करण्यात आला. यावेळी गावाचा एक अमृत कलश तयार करण्यात येऊन ज्यांच्याकडे शेती आहे अशा कुटुंबाची शेतातातील माती व ज्यांचे कडे शेती नाही अशा कुटंबाकडून तांदूळ घरोघरी या कलशात संकलित करण्यात आले. कलशा व्यतिरिक्त संकलित झालेली माती गावातीलच अमृतवाटिकेसाठी वापरली जाणार आहे.मोताळा तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक ठिकाणी व इमारतींची साफसफाई आधी स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातातील स्वच्छतेचे फलक स्वच्छता व पर्यावरण, प्लास्टिक बंदी आदी घोषणा, लेझीम, प्रभात फेरी, यामध्ये ग्रामस्थांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग यामुळे गावातील वातावरण पूर्णपणे स्वच्छता मय झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.कार्यक्रमास पंचायत मोताळाचे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र तायडे व अशोक काळे विस्तार अधिकारी (आरोग्य) मधुकर तायडे, ग्रामसेवक वैराळकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार व तालुका स्तरावरील गट समन्वयक व समन्वय समन्वयक यांची उपस्थिती होती.