नवसाला पावनारा केळझरचा श्री वरद विनायक

23 Sep 2023 20:00:43
तभा वृत्तसेवा
केळझर, 
Shri Varad Vinayak : केळझरच्या श्री सिद्धी विनायकाची स्थापना राम जन्मापूर्वी श्री रामाचे गुरू वशिष्टांनी केल्याची नोंद वशिष्ठ पुराणात आहे. महाभारतात पांडवांच्या वनवास काळात नरभक्षक बकासुराचा वध करून एकचक्र गणेशाचे दर्शन घेऊन हे नगर सोडल्याची नोंद महाभारतात आहे. देशातील 121 गणेश स्थानांमध्ये याचा समावेश होतो. गावाच्या उतरेकडील टेकडीवर दक्षिणाभिमुख ही जागृत 4 फुटांची उजव्या सोंडेची मुर्ती आहे. नवसाला पावणार गणपती याची ओळख आहे.
 
Shri Varad Vinayak
 
सुमारे साडेसोळा एकरातील पडीत किल्ल्यावर हे Shri Varad Vinayak मंदिर आहे. मंदिराच्या उत्तरेस कुशावर्त पायर्‍यांची विहीर आहे. बाजूच्या सातपुड्याच्या उपरांगांमध्ये गणेश खोरी नामक स्थान आहे. येथे सुद्धा एक गणेश मुर्ती स्थापन केली आहे. देशभरातुन वर्षभर पर्यटकांची मंदियाळी येथे राहते.
 
 
शासनाने या स्थळाला क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. Shri Varad Vinayak रिसरात साधना कक्ष, स्वयंपाक घर, भक्त निवास, सांस्कृतिक सभागृह, व्यायाम शाळा, प्रसाधन गृह, बगीचा या सर्व सोई तयार करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या उत्तरेला गणेश तलाव असुन त्याचे सौेंदर्यीकरण करण्यात आले आहे. प्राचीन नगर असल्यामुळे या मंदिर परिसरात उत्खननात शिवलिंग, भगवान विष्णूं, महालक्ष्मी काळ्या पाषाणातील कोरीव मुर्ती, रामाची प्रतिमा मिळाल्या आहेत. मंदिर परिसरात पुर्वेला बुरजावर शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे दक्षिणेस महालक्ष्मी, विष्णू व संत गजानन महाराजांचेे मंदिर भक्तांच्या दानातून उभरण्यात आले आहेत. मंदिरात वर्षभर उत्सव सुरू असतात. पौष संकष्ट चतुर्थीला यात्रेचे आयोजन करण्यात येते.
 
 
गणेश चतुर्थीपासुन Shri Varad Vinayak प्रारंभ झालेल्या दशदिवसीय उत्सवात रोज सकाळी संध्याकाळी आरती, भजन, अथर्वशीर्ष पठन, गणेशस्तवन असा उपक्रम सुरू आहे. गणेश भक्तांची मोठी रिघ लागलेली आहे. गणेशोत्सवात सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष माधव ईरूटकर, सचिव महादेव कापसे व विश्‍वस्तांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0