रमणीय परिसरात वसलेले चिंतामणी (देवगिरी) देवस्थान

24 Sep 2023 18:14:47
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
Chintamani : तालुक्यातील दारव्हा येथून 3 किमी अंतरावर असलेले चिंतामणी (देवगिरी) मंदिर अनेक दिवसांपासून वसलेले देवस्थान आहे. सुरवातीला हा परिसर ओसाड होता. हे ठिकाणी अतिशय रमणीय असून परिसर मोठा आहे. पार्किंगची व्यवस्था आहे. सहलीकरिता उपयुक्त ठिकाण आहे. आजूबाजूला पर्वतरांगा आहेत. या देवस्थानासाठी ठोकळ परिवारातील गंगाबाई माणिक ठोकळ यांनी 15 गुंठे जागा मंदिराला दिली. त्याच प्रमाणे प्रवेशद्वाराकरीता योगदान दिले. या Chintamani चिंतामणी गणेशाची स्थापना कोंडबाजी ठोकळ यांनी केली. तेव्हा चिंतामणीची मूर्ती कडूलिंबाच्या झाडाखाली स्थित होती. इ. स. 1971 ला या मंदिराचा जिर्णोद्धार सांबशिव गोविंद केळकर व जयवंत चंद्रभान ठोकळ यांच्या पुढाकारातून करण्यात आला. सांबशिव गुरुजी व ठोकळ परिवारांनी यासाठी कठीण परीश्रम घेतले.
 
Chintamani
 
मंदिराच्या मागे कडूलिंबाचे झाड असून त्यातील झाडाचा अर्धा भाग मंदिरावर आहे. याचे विशेष महत्व सांगितले जाते की, श्रीगणेश मंदिरावरील झाडाच्या फांदीची पाने गोड आहेत, असे विश्वस्त दिनेश रमेश ठोकळ सांगतात. याच परिसरात हनुमानाचे मंदिर आहे. समोर नंदी महादेव व तुळशी वृंदावन आहे. Chintamani मंदिराच्या बाजूला विहिर आहे. 20 वर्षांपासून या मंदिराची नोंदणी करण्यात आली असून संस्थानद्वारे विविध उपक‘म राबवले जातात. संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी आरती व महाप्रसाद होतो. अधिक मास, कार्तिक महिना, श्रावणमासात तसेच चतुर्थीला अनेक भाविक दर्शनाचा लाभ घेतात. मंदिराचे बांधकाम सुरू असून, त्याकरिता वैयक्तिक देणगी स्वीकारली जाते. मंदिराच्या विकासाकरिता संस्थानचे अशोक एकनाथ ठोकळ, दिनेश रमेश ठोकळ तसेच पदाधिकारी व गणेशभक्त परिश्रम घेत आहेत, अशी माहिती दिनेश ठोकळ यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0