साप्ताहिक राशिभविष्य
मेष (Aries Zodiac) : कामे मार्गी लागतील
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेले ग्रहमान पाहता आपणास या सप्ताहात आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात एखादी उत्तम संधी निश्चितपणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रलंबित असलेली अनेक कामे या आठवड्यात मार्गी लागू शकतील तसेच आपल्यातील कलागुणांनाही संधी मिळू शकेल. मात्र, असे असले, तरी राशीतील राहू व शनीची दृष्टी काही मंडळींना प्रकृतीची कारणे पुढे करून खोडा घालायचा प्रयत्न करेलच; त्याची मानसिक तयारी ठेवायला हवी. वेळीच औषधोपचार करून घ्यावेत. आपली पथ्ये सांभाळावीत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - 24, 27, 28, 29.
वृषभ (Taurus Zodiac) : आरोग्य सांभाळावयास हवे
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपणास प्रामुख्याने आरोग्य सांभाळण्यास सुचविणारी आहे. या राशीच्या काही मंडळींना उष्णतेचे त्रास, पोटाच्या तक्रारी, पायाची दुखणी निर्माण होऊ शकतील. मात्र, वैद्यकीय उपचारांना पुरेपूर साथ देऊन प्रकृतीत सुधारणा करण्याचे बळदेखील याच ग्रहयोगांमुळे उपलब्ध होईल. वीज व आगीची साधने सावधपणे हाताळावीत. दुसरीकडे आपल्या कार्यक्षेत्रात काहीसे असमाधानाचे वातावरण निर्माण होऊ शकते. सहकार्यांशी मतभेद नको. कुटुंबात वादाचे, मतभेदाचे प्रसंग टाळा. विसंवाद असू नये. शुभ दिनांक - 24, 25, 26, 27.
मिथुन (Gemini Zodiac) : आळस झटकायला हवा
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपणास आळस झटकून कामाला लागण्याचे सुचवीत आहे. सणांच्या व त्यामुळेच काहीसा दगदग-धावपळीच्या या दिवसात कधीतरी आळस बळावण्याची शक्यता असते किंवा काही कामे पुढे ढकलण्याचाही विचार बळावतो. अशात काही संधी हुकण्याची व नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ग्रहमान पाहता आपली चिकाटी टिकवून ठेवल्यास आलेल्या संधीचे आपण सोने करू शकाल. या राशीच्या काही मंडळींच्या व विशेषतः युवा वर्गाच्या कलागुणांना या सप्ताहात वाव मिळेल. शुभ दिनांक - 25, 26, 28, 29.
कर्क (Cancer Zodiac) : भिडस्तपणा बाजूला सारावा
आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती पाहता विशेषतः व्यावसायिक वर्गाला या सप्ताहात व्यवसाय वाढ व त्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काही चांगल्या संधी मिळू शकतील असे दिसते. व्यापारात असलेल्यांना चांगले अर्थार्जन करवून देणारा हा आठवडा ठरू शकतो. स्पर्धेत आपण सरशी करू शकाल. काही मंडळींना त्यांच्या स्वभावातील भिडस्तपणा बाजूला सारून या संधीचा लाभ घ्यायला हवा. दरम्यान, आरोग्याच्या लहान-मोठ्या कुरबुरींसह काही प्रसंगातील त्रागा आपल्या वैतागास तो कारणीभूत ठरू शकतो. खर्चिकपणाही वाढू शकतो. त्याला प्रयत्नपूर्वक आवर घालायला हवा.
शुभ दिनांक - 25, 26, 27, 30.
सिंह (Leo Zodiac) : समाधानकारक यश मिळेल
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती पाहता आपणास व्यवसाय-नोकरीसह काही विषयात येणार्या संधींचा पुरेपूर लाभ मिळू शकणार नसला, तरी निराश व्हायचे कारण नाही. पुढे येणारा काळ आपणास समाधानकारक यश मिळवून देईल व त्याची सुरुवात या सप्ताहाच्या अखेरच्या टप्प्यात होईल. कामात मेहनत, दिलेली वेळ पाळणे असली पथ्ये सांभाळलीत तर उद्योग वधारून आपली आवक वाढताना दिसेल. नवनव्या कल्पना अंमलात आणण्यास अवश्य स्फूर्ती देईल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. शुभ दिनांक - 27, 28, 29, 30.
कन्या (Virgo Zodiac) : आर्थिक सावधगिरी हवी
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती पाहता आपणास आर्थिक दिग्मूढता देणारा हा काळ ठरू शकतो. सणांच्या या मोसमात जरा सढळ हाताने पैसा खर्च करण्याची प्रवृत्ती असतेच; मात्र काही अनावश्यक खर्च आणि पुरेशी सावधगिरी न बाळगल्याने एखादेवेळी होणारी फसवणूक, असे काही त्रासदायक योग याच आठवड्याचे स्वरूप ठरू शकेल. विशेषतः आठवड्याच्या मध्यात सतर्क राहावयास हवे. या काळात आपणास आर्थिक सबलता प्राप्त होईलच; फक्त ती टिकवून ठेवण्याची खबरदारी बाळगावयास हवी. आर्थिक व्यवहारात सावध असावे.
शुभ दिनांक - 24, 26, 29, 30.
तूळ (Libra Zodiac) : भाग्याची उत्तम साथ
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती बघता या राशीच्या मंडळींना हा आठवडा अतिशय उत्तम जावयास हवा. आपल्या सार्या प्रयत्नांना भाग्याची उत्तम साथ मिळेल आणि आपण प्रगतिपथावर अग्रेसर राहाल, असे हे ग्रहमान आहेत. जरा अधिक मेहनत करून आपण आपल्या काही योजनांना किंवा प्रकल्पांना योग्य गती देऊ शकाल. व्यवसाय विस्ताराच्या योजना तसेच नोकरीत अपेक्षित टप्पा गाठण्याच्या दिशेने आपणास पावले टाकता येतील. या उत्साहवर्धक योगांसोबतच काहींना आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
शुभ दिनांक - 24, 25, 28, 29.
वृश्चिक (Scorpio Zodiac) : आरोग्याची कुरबूर संभव
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती पाहता हा सप्ताह आपणास काही संमिश्र योग देण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आर्थिक आवक निश्चितपणे वाढलेली राहील; मात्र तेवढ्याच वेगाने ती खर्च होण्याचीही शक्यता राहील. काही मोठे खर्च अचानक निर्माण होऊ शकतात. सर्व खर्च अनावश्यक नसले तरी त्यांचा आपणास कितपत लाभ होईल, याबाबत शंका राहील. काही मंडळींना प्रकृतीची कुरबूर निर्माण होऊ शकेल. कसली तरी चिंता निर्माण होईल. व्यावसायिक आघाडीवर आपणास चिंता करण्याची गरज नाही. आरोग्य मात्र सांभाळावे लागेल.
शुभ दिनांक - 25, 26, 27, 28.
धनु (Sagittarius Zodiac) : सारे काही थांबलेले
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपणास बरीच सुस्थिती प्रदान करणारी ठरावी. या ग्रहयोगांचा आपणास विशेष लाभ मिळेल; मात्र मागच्या काही दिवसातील वेगवान घडामोडींना या सप्ताहात काहीसा विराम मिळू शकतो. त्यांचा काहीसा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे काहींना जणू सारे काही थांबलेले आहे की काय, सारे काही स्तब्ध असल्याचा अनुभव येऊ शकतो. मानसिक ताण असेही काहीसे होऊ शकते. काहींना हवामानातील बदलामुळे निर्माण होणारे त्रास बळावू शकतात.
शुभ दिनांक - 27, 28, 29, 30.
मकर (Capricorn Zodiac) : मेहनतीनेच कार्यक्षेत्रात प्रगती
या आठवड्याच्या प्रारंभी काहीशी संमिश्र ग्रहस्थिती आपल्या वाट्याला आली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या कर्मक्षेत्रात, म्हणजे नोकरी-व्यवसायात काही चांगल्या संधी, प्रगती, वाढ देणार्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, हे काही सहजासाहजी मिळणारे नाही. त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. प्रसंगी वाटही पाहावी लागणार आहे. हाती येईल त्यावेळी त्या यशाला बरीच बळकटी मिळालेली असेल. या राशीच्या नोकरी-व्यवसायाच्या शोधात असणार्यांना काही युवांना चांगली संधी लाभेल. अधिकार्यांची मर्जी संपादित करता येईल.
शुभ दिनांक - 25, 26, 28, 30
कुंभ (Aquarius Zodiac) : अपेक्षित संधी लाभणार
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी आपल्याला उत्तम ग्रहस्थिती लाभली आहे, असे म्हणता येईल. राशिस्वामी आपल्या राशीतच सुखेनैव विराजमान आहे. त्यामुळे त्याने आपल्या भोवती एक सुरक्षेचे कवचच जणू निर्माण केले आहे, असे म्हणता येईल. काहींना नोकरी-व्यवसायात अपेक्षित संधी लाभून कार्ये तडीस जावीत. आपल्याला वेगाने प्रगतीचे टप्पे गाठता येतील, असे हे ग्रहमान आहे. प्रचंड आत्मविश्वास, मिळणार्या यशामुळे दुणावणारा उत्साह यामुळे धडाडीने काही अकल्पित लक्ष्यही गाठू शकाल. कुटुंबात समाधानाचे, उत्साहाचे वातावरण राहील. नव्या उपक्रमांची मुहूर्तमेढ करता येईल. शुभ दिनांक - 25, 26, 28, 29.
मीन (Pisces Zodiac) : मरगळ झटकली पाहिजे
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपल्यासाठी काही विचित्र व अडचणीचे प्रसंग निर्माण करणारी ठरू शकते. या सप्ताहात आपल्या कामात, व्यवहारात काहीसा संथपणा निर्माण होऊ शकतो व तोच आपणास अडचणीत आणणारा राहील, असे वाटते. आपण संथ असल्याचे पाहून विरोेधक जोर धरू शकतात. त्यामुळे आळस झटकून कामाला लागले पाहिजे. मरगळ झटकली पाहिजे. खंबीरपणे पावले उचलली पाहिजेत. चिकाटीने आपले काम पूर्ण करून वरिष्ठांची मर्जी संपादन करणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात निकराचे प्रसंग उद्भवल्यास ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. मार्ग निघेल.
शुभ दिनांक - 25, 26, 29, 30.
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746