जनता सहकारी बँकेला 2.2 कोटींचा नफा

25 Sep 2023 20:08:15
गोंदिया, 
Janata Sahakari Bank गोंदियासह भंडारा, नागपूर, गडचिरोली आणि चंदपूर जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या असलेल्या जनता सहकारी बँकेने 2.2 कोटी रुपयांचा नफा 31 मार्च 2023 या कालावधीत मिळविला आहे. नफ्यातून सर्व भागधारकांना 12 टक्के लाभांश देण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष सीए दिनेश दादरीवाल यांनी केली.
 
 
Janata Sahakari Bank
 
ते शहरातील जलाराम लॉन येथे रविवार, 24 सप्टेंबर रोजी आयोजित 54 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. सभेला बँकेचे उपाध्यक्ष राजकुमार तिवारी, संचालक ईश्‍वरदास असाटी, मोहनलाल बंसल, सीए सुशील अग्रवाल, जगदीश अग्रवाल, राजकुमार नोटानी, धीरज अग्रवाल, सुनील अग्रवाल, मुकेश साहू, डॉ. गजानन डोंगरवार, नंदकिशोर असाटी, संचालिका हर्षिला वैद्य, शिला तिवारी, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भाऊराव उके, रमेशचंद्र जोशी, उमेश मेंढे, उमंग पटेल उपस्थित होते. Janata Sahakari Bank दीपप्रज्वलन व लक्ष्मीजींच्या प्रतिमेचे पूजनाने सभेला सुरवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश जोशी यांनी मागील सभेच्या कार्यवाहीचे वाचन केले. दादरीवाल यांनी बँकेचे जमा भांडवल 187.54 कोटी, कर्ज वाटप 94.92 कोटी, गुंतवणूक 110.12 कोटी निव्वळ एनपी कर्ज 0.59 टक्के सीआरएआर 17.75 टक्के, आर्थिक वर्षात अग्रक्रत क्षेत्राला 81.10 कोटी आणि दुर्बल घटकांना 26.42 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे सांगीतले. 31 मार्च 2023 रोजी बँकेने 2.2 कोटी रुपयांचा नफा कमावला असून भागधारकांना 12 टक्के लाभांश रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर वितरित करण्यात येणार असल्याचे दादरीवाल यांनी सांगीतलेे. तसेच बँकेच्या आर्थिक लेखापरीक्षकाच्या नियुक्तीबाबतची माहिती ही दिली. गत आर्थिक वर्षाचे बँकेचे उत्पन्न व स्थिती विवरण बँक अधिकारी श्याम गोटे यांनी सादर केले. निव्वळ नफा गुंतवणुकीची माहिती उपासना दियेवार यांनी दिली. 2023-2024 वर्षाचा अर्थसंकल्प प्रस्तुतीकरण दिप्ती खंडेलवाल यांनी मांडला. बँकेचे अंकेक्षण व दोष दुरुस्ती अहवाल सुशील अग्रवाल यांनी वाचन केला. यावेळी भाऊराव उके यांची गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी व जगदीश अग्रवाल यांची गोंदिया खरेदी व विक्री संस्थेच्या संचालकपदी सहाव्यांदा निवड झाल्याने आणि बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप काठोके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सभेत सभासद अश्‍विनीकुमार बागडे, विजेंद्र जैन, महेश दिवाणी, जगतराम आहुजा, विजयकुमार लाटा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची दादरीवाल, उमेश जोशी यांनी उत्तरे देऊन समाधान केले. आभार प्रदर्शन संचालक धीरज अग्रवाल यांनी केले.
Powered By Sangraha 9.0