उस्मानाबाद,
Maharashtra Ganesha : महाराष्ट्रातील तेर हे कदाचित एकमेव गाव असेल, जेथे एक-दोन नव्हे तर, तब्बल 21 पुरातन गणेशमूर्ती अस्तित्वात आहेत. हिंदू, बौद्ध, जैन अशा विविध धर्मांशी हजारो वर्षांचा ऋणानुबंध असलेल्या तगर म्हणजेच आजच्या तेर गावचा इतिहास थक्क करणारा आहे. या परिसरात शैव, वैष्णव, शाक्य सांप्रदायाचे केवळ अस्तित्वच नाही, तर त्यांचे इथे प्राबल्यही होते. गणपतीला इष्टदेव मानणारा वर्गही हजारो वर्षांपासून वास्तव्यास होता. त्यामुळेच पुरातन गणेशमूर्ती आजही गतकाळातील समृद्ध वारशाचा सप्रमाण पुरावा देत आहे. तेर हे कदाचित एकमेव गाव असेल, जेथे 21 पुरातन (Maharashtra Ganesha) गणेशमूर्ती अस्तित्वात आहेत.
तेर येथे झालेल्या उत्खननात विविध प्रकारच्या दगडांमधून निर्माण करण्यात आलेल्या अनेक (Maharashtra Ganesha) गणेशमूर्ती उत्खननातून समोर आल्या आहेत. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात त्या आजही आपल्याला पहावयास मिळतात. आकाराने लहान परंतु कलाकुसरीच्या दृष्टीने अत्यंत आकर्षक असलेल्या या मूर्तींकडे पाहताना प्राचीन काळातील गणेशपूजकांची दृष्टी स्पष्ट होते. या शासकीय वस्तुसंग्रहालयात मोरावर आरूढ असणारा गजानन हातामध्ये कमळकळी, डमरू व त्याचा आवडता मोदक घेवून बसला आहे.
उत्तर यादवकालीन मानल्या जाणार्या (Maharashtra Ganesha) गणेशमूर्तीच्या मस्तकावरील मुकुट, गळ्यातील हार, पायातील तोडे, कंकण, मेखला आणि अंगावरचे यज्ञोपवितही लक्षवेधी पद्धतीने कोरले आहे. मोदकाना सोंडेने स्पर्श करणारा हा गजवदन शहाबादी दगडापासून कोरण्यात आला आहे. मेंडेश्वराच्या पाठीमागे असलेले शिल्प, तुंगेश्वर मंदिरातील गणपती, कणकेश्वर महादेवाच्या मागील वरदविनायका अप्रतिम (Maharashtra Ganesha) गणेशमूर्तीचे दर्शन घेताच भाविकांना मोठे समाधान लाभते. तेरमधील विविध मंदिरात विविध काळातील गणनायकाच्या मूर्ती आजही सुस्थितीत आहेत.