लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान

    दिनांक :25-Sep-2023
Total Views |
मुंबई,
Lalbagh Raja : गणेश चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी 60,62,000 रोख रकमेच्या दानाची नोंद करण्यात आली आहे. राजाला 183.480 ग्रॅम सोन्याचे दान भाविकांकडून करण्यात आले आहे तसेच 6,222 ग्रॅम चांदीच्या दानाची नोंद करण्यात आली. लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी 42 लाख रुपयांची रोख रक्कम जमा झाली होती. यात 198.550 ग्रॅम सोने आणि 5440 ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या होत्या.
 
Lalbagh Raja
 
पहिल्याच दिवशी (Lalbagh Raja) लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पहिल्या दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर उशिरापर्यंत लालबागचा राजा मंडळाकडून पहिल्या दिवशी दान आलेली रोख रक्कम, वस्तूंची मोजदाद पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी करण्यात आलेल्या दानाचे देखील मोजदाद मंडळाकडून करण्यात आली आहे.
 
 
लालबागच्या राजाच्या (Lalbagh Raja) दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या या वस्तूंचा नंतर लिलाव केला जातो. त्यातून जमा होणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. मुंबईतील गणेशोत्सव हा देशातीलच नाही तर परदेशातील नागरिकांचा देखील उत्सुकतेचा विषय आहे.