महाराष्ट्रासह देशातील चार सहकारी बँकांना दंड

25 Sep 2023 18:27:23
मुंबई, 
Co-operative banks : नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील दोन बँकांसह देशातील चार सहकारी बँकांना 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात उत्तरप्रदेश आणि जम्मूमधील प्रत्येकी एका बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने चारही बँकांपैकी उत्तरप्रदेशातील एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून 11 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
 
Co-operative banks
 
यात द सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एचसीबीएल (Co-operative banks) को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, श्री वारणा सहकारी बँक लिमिटेड आणि राज्य परिवहन सहकारी बँक लिमिटेड या बँकांचा समावेश होतो. रिझर्व्ह बँकेने ‘सुपरवायझरी अ‍ॅक्शन फ्रेमवर्क’ अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्या विशिष्ट निर्देशांचे आणि ‘एक्सपोजर नॉर्म्स’अंतर्गत निर्देशांचे पालन न केल्याबद्दल जम्मूतील द सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 6 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
Powered By Sangraha 9.0