मराठवाडा मुक्तीसंग्रामवर नाटक, एक अप्रतिम आविष्कार : जितेंद्र पापळकर

सादरीकरणास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :25-Sep-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
कळमनुरी,
Marathwada Liberation मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या भूमिपुत्रांच्या जाज्वल्य संग्रामाचा इतिहास सांगणारी घटना महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयमार्फत आयोजीत गाथा मुक्तीसंग्रामाची हे दोन अंकी नाटक केंबि‘ज स्कूल ऑफ स्कॉलर्स, कळमनुरी शाळेच्या प्रांगणामध्ये आर्टिस्टिक ह्युमन्स या संस्थेने यशस्वी सादर केले.यातील कलाकारांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील आठवणींना उजाळा दिला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामचे उत्कृष्ट निर्देशन व उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल सर्व सर्व चमुंचे अभिनंदन केले.
 
मराठवाडा मुक्तीसंग्राम  
 
अप्रतिम अभिनयाद्वारे कलाकारांनी स्वामी रामानंद तीर्थ, सरदार वल्लभभाई पटेल, वेद प्रकाश, सांडू हजाम, दगडाबाई शेळके, बन्सीलाल, गोविंदभाई श्रॅाफ, कर्वे गुरुजी, आनंदराव वाघमारे, यांच्या भूमिका जिवंत केल्या. अभिनयाचे सादरीकरण पाहताना प्रेक्षकही भारावून गेले होते.Marathwada Liberation हैदराबाद मुक्तीसंग्रम लढ्याच्या स्मृती यावेळी जिवंत करण्यात आल्या.ही नाटिका बघण्याकरीता हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कळमनुरी तहसीलदार सुरेखा नांदे, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक दीपिका राऊत, केंब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्सचे संस्थाध्यक्ष डॉ. संतोष कल्याणकर, डॉ. शितल कल्याणकर, प्राचार्य जयवंत भोयर, पत्रकार दिलिप खोडके, पत्रकार गोपाल काकडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. या नाटिकेला प्रेक्षकांची मोठ्या सं‘येने उपस्थिती होती.शासनामार्फत नियुक्त समन्वयक व आर्टिस्टिक ह्युमन्स संस्थेचे संचालक दर्शन महाजन व त्यांच्या चमुने या नाटकाचे सादरी करण्यासाठी परिश्रम घेतले. या नाटकाचे लेखन, डॉ. सतीश साळुंके, अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे आणि दिग्दर्शन प्रमोद शेलार यांनी केले होते. या नाटकात मैत्रेय भंडारे, प्रकाश सावळे, शिवम परमार, पारस वीरा, शौर्य राऊत, जान्हवी कांबळे, शर्वरी जुकर, ओमप्रकाश तुडमे, निखिल सोनी, आलोक शुक्ला, केतन आढाव, निमित डोबरिया, अनुभा गुप्ता, श्रेयस खरबडे आणि दर्शन महाजन यांनी अभिनय सादर केला.