मोरभवन बसस्थानक उद्यापासून सुरू

25 Sep 2023 18:49:04
नागपूर,  
Morbhavan bus station एसटी महामंडळाच्या 12 बसेस पाण्यात डुबल्याने त्या आता गणेशपेठच्या आगारात दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात मोरभवन बसस्थानकात या बसेस उभ्या होत्या. सर्व बसेसचा इंजिनमध्ये पाणी शिरल्याने या बसेस दुरूस्तीकरिता पाठविण्यात आल्या आहे. मोरभवन बसस्थानक परिसरात चिखल असल्याने सोमवारी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. संपूर्ण परिसर स्वच्छ झाल्यानंतर उद्या मंगळवारपासून मोरभवन बसस्थानकावरुन प्रवाशांना बसेस उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिली.
 
 
Morbhavan bus station
 
शनिवारी पावसाचे पाणी एवढे जास्त होते की या 12 बसेसच्या खिडक्यांपर्यंत पाण्यात बुडाल्याने रविवारी या बसेस गणेशपेठ आगारात पाठविण्यात आल्या. Morbhavan bus station मध्यवर्ती मोरभवन बसस्थानकात रात्रीच्या वेळी तिरोडा, तुमसर, पवनी, भंडारा आणि रामटेक आगाराची प्रत्येकी एक, तर साकोली आगाराच्या तीन आणि सावनेर आगाराच्या चार अशा एकूण 12 बसेस उभ्या होत्या.रविवार आणि सोमवारी मोरभवन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्याने आता नियमितपणे बस वाहतुक सुरु होणार आहे.
Powered By Sangraha 9.0