शरद पवारांचे सात आमदार अजित पवार गटात

नागालँडमध्ये मोठा धक्का

    दिनांक :25-Sep-2023
Total Views |
मुंबई, 
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. आता शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे. नागालँड येथील 7 आमदारांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सोमवारी खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रपरिषद घेऊन माहिती दिली.
 
Sharad Pawar
 
पत्रपरिषदेत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नागालँड येथील सात आमदारांचे स्वागत केले. नागालँड येथील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही उपस्थित होते. तटकरे म्हणाले, आम्ही नागालँड येथील सर्व आमदारांना विनंती करीत होतो. आता हे सर्व आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. आता नागालँडमध्ये शरद पवार गटाने आमदारांविरोधात आक‘मक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रानंतर नागालँडमध्येदेखील शेड्युल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाईची मागणी (Sharad Pawar) शरद पवार गटाने केल्याचे बोलले जात आहे.