निसर्गाचा प्रकोप; ढगफुटीचा कहर!

25 Sep 2023 20:06:44
वेध
- नितीन शिरसाट
imd-cloud burst-alert हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात अतिपावसाचा ऑरेंज अलर्ट दिल्यानुसार विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसारखा कोसळधार पाऊस धो-धो बरसला. त्याचा सर्वाधिक फटका ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उपराजधानी नागपूरला बसला आहे. imd-cloud burst-alert याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, परभणी, जळगाव पाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यात निसर्गाच्या प्रकोपाने आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. हजारो घरांची पडझड झाली. खरिपाची पिके पुरात वाहून गेली. फळबाग-पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले. imd-cloud burst-alert जनजीवन विस्कळीत झाले. विजांच्या प्रचंड कडकडाटात अनेकांनी जीव मुठीत घेऊन रात्र जागून काढली. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार ढगफुटी पावसामुळे नागपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली. imd-cloud burst-alert चार तासांत १०० मि. मी. हून अधिक पाऊस कोसळल्याने ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली.
 
 
 
imd-cloud burst-alert
 
 
अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने नागनदी, पिवळी नदीला पूर आला. पुराचे पाणी सखल भागांतील झोपडपट्ट्यांसह अनेक मध्यवर्ती वस्त्यांमध्येही शिरले. imd-cloud burst-alert नागरिकांना जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागली. लष्कर व एनडीआरएफ जवानांनी जलमय भागातून शेकडो नागरिकांना बोटीमधून सुरक्षित स्थळी हलविले. आकाशात प्रचंड स्फोटासारख्या आवाजाने नागपूरकर हादरले. नागपुरातील या परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून घेण्यात आला. फडणवीसांनी पुरातील नुकसानग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. ढगफुटी नैसर्गिक घटनेत ‘कोलोनिमबस' हा ढगाचा प्रकार सर्वात जास्त पाऊस देणारा आहे. imd-cloud burst-alert ‘एकत्र जमणारे ढग' असा त्याचा अर्थ. गरम हवा आद्र्रतेने ढगात पाण्याचे प्रमाण वाढते. या प्रक्रियेत अब्जावधी थेंब ढगात विखुरले जातात. हवेचा वेग जास्त असल्याने पाण्याचा थेंब वर घेऊन जातो. हा निसर्गाचा विलक्षण खेळ असल्याने पाण्याचे थेंब एकमेकांवर आदळतात.
 
 
 
३.५ मीटरपर्यंत पाण्याचा आकार वाढतो. त्याचा वेग ताशी १२ किलोमीटरपर्यंत; त्यापेक्षाही जास्त असतो. नळाच्या पाण्याप्रमाणे थेंब पडतात. कमी वेळात पडणारा सर्वाधिक पाऊस स्थानिक हवामानानुसार घडणारी घटना असली, तरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तसेच अरबी समुद्रावरून भूभागावर येणारा बाष्फी साठा त्यामुळे पावसाळ्यात हे ढग फुटतात. एकमेकांवर मोठ्या प्रमाणात ढग आदळल्याने प्रचंड विजांचा कडकडाट होतो. imd-cloud burst-alert जगातील सर्वात मोठी ढगफुटी लेह लडाख येथे ६ ऑगस्ट २०१० रोजी झाली. एका मिनिटात ४८.२३ मिमी पावसाची नोंद त्यावेळी करण्यात आली. हिमाचल प्रदेशात २६ नोव्हेंबर १९७० मध्ये एका मिनिटात ३८.१० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. २६ जुलै २००५ रोजी मुंबई येथे ८ तासांत ३७ इंच पाऊस पडल्याने नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले. imd-cloud burst-alert तसेच ढगफुटीने दरड कोसळून माळीण गाव (जि. पुणे) रात्रभरात होत्याचे नव्हते झाले.
 
 
या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. महाड तालुक्यातील तळिये गाव २२ जुलै २०२१ रोजी भुईसपाट झाले. यात ५३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ढगफुटी ही अत्यंत आव्हानात्मक नैसर्गिक आपत्ती आहे. imd-cloud burst-alert त्याचे अचूक पूर्वानुमान करणे हीसुद्धा एक प्रचंड गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हवामानशास्त्र आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संशोधन संस्था या घटनेचे पूर्वानुमान लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. हवामान निरीक्षण केंद्रांचे जाळे मजबूत केल्यास त्यावरून येणाऱ्या माहितीची या कामी मदत होऊ शकते. या घटना स्थानिक स्वरूपाच्या असल्याने जास्तीत जास्त ठिकाणी हवामान केंद्र उभारून त्यायोगे माहितीचा साठा तसेच सद्यस्थितीचा आढावा घेतला गेला पाहिजे. imd-cloud burst-alert स्थानिक संस्था, नागरिक यांच्या मदतीने ढगफुटीची शक्यता असलेल्या परिसरात योग्य नियोजन केल्यास नुकसान मर्यादित राहू शकेल.
 
 
भारतीय हवामानशास्त्र संस्थेने डेहराडून येथे आयोजित केलेल्या ‘फ्रन्टिअर्स ऑफ मीटिओरोलॉजी विथ स्पेशल रेफरन्स टू द हिमालय' या परिषदेत विविध तज्ज्ञ सहभागी झाले होते. imd-cloud burst-alert वातावरणीय शास्त्र, भूशास्त्र, रिमोट सेन्सिंग त्याचप्रमाणे रडार, स्वयंचलित हवामान केंद्रासारखे नवीन तंत्रज्ञान अशा अनेक विषयातील अभ्यासकांनी ढगफुटीसोबत इतर नैसर्गिक संकटांसंबंधी मते मांडली. हिमालय परिसरातून मिळणारी माहिती अपुरी असल्याने या क्षेत्रातील भूभाग, वातावरणातील उच्चस्तर, कृषिसंबंधित माहिती केंद्र तसेच रडारचे जाळे तातडीने वाढविण्याची गरज आहे. हवामानाशी संबंधित घटना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवादमाध्यमांचा अधिक प्रभावीपणे उपयोग करायला हवा. imd-cloud burst-alert तातडीने प्रभावी परिसरात हवामान संवाद यंत्रणा मजबूत करायला हवी.
 
९८८१७१७८२८
Powered By Sangraha 9.0