संपूर्ण लोखंडाच्या ग्रहाचा लागला शोध!

पृथ्वीपेक्षा थोडा लहान

    दिनांक :25-Sep-2023
Total Views |
वॉशिंग्टन,
iron planet शास्त्रज्ञांनी एका अशा ग्रहाचा शोध लावला, जो संपूर्णपणे लोखंडाचा बनलेला आहे आणि तो लोह धातू अर्थात् आयरनने परिपूर्ण संपन्न आहे. हा ग्रह आपल्या पृथ्वीपेक्षा आकाराने थोडा लहान आहे. या ग्रहाचे नाव ‘ग्लीज367 बी’ असे ठेवण्यात आले आहे. हा ग‘ह आपल्या सूर्याभोवती एक फेरी 7.7 तासांमध्ये पूर्ण करतो. हा एक अल्ट्राशॉर्ट पीरियड ग्रह आहे. याचा अर्थ, त्याची सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची गती जास्त आहे. त्यामुळे तो अवघ्या 7.7 तासांत सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. वैज्ञानिकांनी आतापर्यंत पाच हजारांवर एक्सोप्लॅनेट अर्थात् बाह्य ग्रहाचा शोध लावला आहे. यातील दोनशे ग्रह अल्ट्राशॉर्ट पीरियड ग‘ह आहेत. हा नवा ग्रह त्यातीलच एक आहे. तो अल्ट्राशॉर्ट असल्याने अद्भूत ठरत नाही तर, iron planet पृथ्वीवर जितके आयरन आहे, त्यापेक्षा दुप्पट आयरन या ग्रहावर आहे. ‘ग्लीज367 बी’ हा ग्रह लोह धातूने संपन्न आहे. त्यात संपूर्ण शुद्ध लोह आहे. या ग‘हाचा शोध लावण्यासाठी ट्रांजिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईटची मदत घेण्यात आली. सध्या या ग्रहावर अभ्यास केला जात आहे. याविषयीचा नवा अभ्यास अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
 

wq3
 
दोन वर्षांआधीच लागला शोध
  • या लोहखनिजयुक्त ग्रहाचा शोध दोन वर्षांपूर्वीच लागला
  • ग‘ह नेमका कशाने बनलेला आहे, याचा अभ्यास करण्यात आला
  • तुरिन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिक एलिजा गोफो यांच्या मते, ‘ग्लीज367 बी’ हे दोन जुळे भाऊ आहेत. मात्र, त्यांच्या फिरण्याच्या गतीत अंतर आहे
  • आपल्या सूर्याचा जो रंग आहे, तसाच रंग या ग‘हाच्या सूर्याचा आहे
  • पृथ्वीचा जो आकार आहे, त्याच्या 72 टक्के आकार या ग्रहाचा आहे
  • वजनही पृथ्वीच्या तुलनेत 55 टक्के आहे. घनत्व मात्र दुप्पट आहे