प्रियंका-परिणीतीची ओढणी आहे खास!

pariniti-wedding-lehenga जाणून घ्या काय आहे कारण ?

    दिनांक :25-Sep-2023
Total Views |
नवी दिल्ली,
 
pariniti-wedding-lehenga अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनास यांच्या विवाहाच्या वेळी प्रियांकाच्या महागड्या डिझायनर लेहेंग्याची चर्चा झाली होती. pariniti-wedding-lehenga शिवाय, तिच्या ओढणीचीही नेटक-यांमध्ये बरीच चर्चा रंगली. आता, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या विवाहातील देखण्या पेहरावावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यात प्रियंका आणि परिणीतीच्या ओढण्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्यात.
 
 

pariniti-wedding-lehenga 
 
 
२४ सप्टेंबर रोजी विवाहबद्ध झालेले राघव-परिणीती यांची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. pariniti-wedding-lehenga ‘पर्ल व्हाईट' अशी थीम असलेल्या या विवाह सोहळ्यात परिणीतीने हलक्या मोतिया रंगाचा लेहेंगा आणि त्यावर अनकट पाचू-हि-यांचे दागिने घातले होते. pariniti-wedding-lehenga परिणीतीच्या हातातील कलिरेदेखील खास असून त्यामध्ये राघव-परिणीतीच्या प्रेमकथेची प्रतिके लावली होती. तर, परिणीतीच्या ओढणीवर तिच्या पतीचे नाव ‘राघव' लिहिलेले आहे. परिणीतीने शेअर केलेल्या फोटोजपैकी एका फोटोमध्ये तिच्या ओढणीवर सोनेरी रंगात देवनागरी लिपीत राघव असे लिहिलेले दिसत आहे. pariniti-wedding-lehenga
नक्की वाचा ही बातमी ... परिणीतीचा पहिला फोटो आला समोर
 

pariniti-wedding-lehenga 1 
 
यानिमित्ताने नेटकऱ्यांना परिणीतीच्या चुलत बहिणीचे म्हणजे प्रियंका चोप्राचे लग्न आणि तिचा लेहेंगा आठवला आहे. प्रियांकानेदेखील तिच्या पतीचे म्हणजेच निक जोनासचे नाव ओढणीवर लिहिले होते. pariniti-wedding-lehenga प्रियांका आणि निकचा विवाह ख्रिश्चन पद्धतीनेही झाला होता. त्यात, प्रियांकाच्या वेडींग गाऊनच्या वेलवर निकोलस जेरी जोनास असे पूर्ण नाव लिहिले होते. त्यासोबतच, दिसंबर २०१८, कम्पॅशन आणि ओम नम: शिवाय असेही लिहिले होते. अमेरिकेतील प्रख्यात ड्रेस डिझायनर ब्रॅण्ड राल्फ लॉरेनने हा ड्रेस डिझाईन केला होता. pariniti-wedding-lehenga त्यांच्या हिंदू पद्धतीने झालेल्या विवाह सोहळ्यात प्रियांकाने सव्यसाचीने डिझाईन केलेला लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. नक्की वाचा ही बातमी ... राघव-परिणितीचे केजरीवालांनी केले अभिनंदन
 
 
दरम्यान, परिणीतीचा हा लेहेंगा मनिष मल्होत्राने डिझाईन केला असून त्यावर हाताने कशिदाकारी करण्यात आली आहे. pariniti-wedding-lehenga हा लेहेंगा तयार होण्यासाठी १०४ दिवस लागल्याचं सांगण्यात येत आहे. राघव-परिणीतीच्या विवाहसोहळ्याचे निवडक फोटो व्हायरल झाले असून, चाहत्यांच्या शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षाव होतो आहे. pariniti-wedding-lehenga