पथ्रोटमध्ये घरकुलाच्या जागेवरून वाद

26 Sep 2023 20:33:10
तभा वृत्तसेवा
पथ्रोट,
Patthrot gharkul : ग्रामपंचायतने नीलगिरी वनात केलेल्या घरकुल व्यवस्थेवर ठाम असल्याबाबत घेतलेल्या निर्णयाला वार्ड क्र.4 मधील काही रहिवाशांनी नापसंती दर्शवत राहत्या जागेच्या प्रलंबित मागणीसाठी ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात अधिकार्‍यांनी पुढाकार घेऊनही तोडगा निघालेला नाही.
 
Patthrot gharkul
 
बस स्टॅन्ड परिसरातील शासकीय भूखंडावरील 39 कुटुंब सन 1991 पासून अतिक्रमण करून राहत आहे. Patthrot gharkul सध्या राहत असलेली जागा त्यांच्या नावे नियमानुकूल करून शासकीय घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी अतिक्रमणधारकांची ग्रामपंचायतकडे मागणी होती. त्यावर नीलगिरीच्या शेतामध्ये सर्व लाभार्थ्यांची निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याबाबतचा मासिक ठराव ग्रामपंचायतने घेतला असून जागा मागणीचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करण्यात आलेला आहे. तर बस स्टॅन्डवरील ई क्लासची जागा नगरपंचायतीच्या प्रयोजनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या आशयाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आलेला आहे.
 
 
सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर Patthrot gharkul ग्रामपंचायतकडून अशा वंचित लाभार्थ्यांना भूखंडाचे रीतसर वाटप करण्यात येणार आहे. परंतु वार्ड क्रमांक चार मधील दहा महिला, पुरुषांनी जुनीच जागा घरकुलासाठी देण्याचा आग्रह धरून ग्रामपंचायतसमोर 19 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यावर ग्रामपंचायतने एक प्रस्तावही उपोषणकर्त्यांपुढे मांडला आहे, परंतु तो प्रस्तावही अमान्य करून आमरण उपोषण मागे न घेता मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणार असल्याच्या निर्धार व्यक्त केला आहे. उपोषणस्थळी गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी भेटी देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच तोडगा निघाला नाही.
Powered By Sangraha 9.0