खलिस्तान्यांबाबत कॅनडाची भूमिका नरमाईची

    दिनांक :26-Sep-2023
Total Views |
-हिंसाचार, माकपदार्थ तस्करीवर मौन
 
नवी दिल्ली, 
Canada Khalistan कॅनडाच्या जमिनीवर खलिस्तान्यांची राजकीय बाजू घेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मागील 50 वर्षांपासून मुक्तहस्त दिला जात आहे. मात्र, या कट्टरवाद्यांच्या धमक्या, हिंसाचार आणि मादकपदार्थांच्या तस्करीवर कॅनडाने मौन ठेवले आहे, असे सूत्रांनी सांगितले. खलिस्तानी अतिरेक्यांनी 1985 मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क विमानात बॉम्बस्फोट घडवला होता. 9/11 पूर्वी घडवेला हा जगातील सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला होता. कॅनडातील यंत्रणांच्या बोटचेपी धोरणामुळे यातील प्रमुख आरोपी तलविंदरसिंग परमार आणि त्याचे कित्येक खलिस्तानी साथीदार सुटले होते, असे सूत्रांनी सांगितले.
 
 
Jastin dksl;
 
दुर्दैवाने, Canada Khalistan कॅनडातील खलिस्तानी कट्टरवाद्यांचा तो आज नायक आहे आणि कॅनडातील शीख फॉर जस्टिसने प्रचार केंद्राला त्याचे नाव दिले आहे. कित्येक वर्षांपासून खलिस्तान्यांना मोकळा हात मिळाला असून, कॅनडात कोणत्याही शिक्षेशिवाय त्यांच्या कारवाया सुरू आहेत. पंजाबमध्ये मागील दशकभरात घडलेल्या दहशतवादी कारवायांपैकी निम्म्या प्रकरणांत कॅनडातील खलिस्तानी कट्टरवाद्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 2016 नंतर पंजाबमध्ये झालेल्या शीख, हिंदू आणि ख्रिश्चनांच्या लक्ष्यांकित हत्यांमध्ये कॅनडात हत्या करण्यात आलेल्या निज्जरचा हात होता. मात्र, कॅनडातील यंत्रणांनी त्याची किंवा त्याचे मित्र भगतसिंग ब्रार, पॅरी दुलाई, अर्श दल्ला, लकबिर लांडा आणि कित्येकांची चौकशी केली नाही. पंजाबमध्ये हत्या झालेल्यांच्या मृतदेहांची संख्या वाढत असताना, कॅनडासाठी मात्र ते राजकीय कार्यकर्तेच होते, असे सूत्रांनी सांगितले.